वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्ग चे अर्धवट काम तात्काळ पूर्ण होणार… मा.श्री नितीन गडकरी

132

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.8 डिसेंबर) :- गेल्या सात वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 – ई रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. सदर वरोरा ते चंद्रपूर रस्त्याचे बांधकाम एस .आर .के (SRK)कंट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे परंतु यांच्या हलगर्जी पणामुळे रस्त्याच्या बांधकामात दिरंगाई होत असल्याने विविध टप्प्यात अर्धवट पुलाचे व रस्त्याचे बांधकाम केल्याने ठीक ठिकाणी मोठमोठे खड्डे आणि भेगा पडलेले आहे रस्त्याच्या बांधकामात दुर्लक्ष केल्याने रस्ते अपघातात वारंवार नागरिक मृत्युमुखी पडले आहे तरी काहींना कायमचे अपंगत्व आले असून कंपनीच्या चुकीच्या कामामुळे खूप वेळा नागरिकांनी जीव गमावला आहे.

तसेच रस्त्यालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना चुकीच्या बांधकामामुळे व सततच्या धुळीमुळे 6,7 वर्षापासून शेती पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहेत त्याचप्रमाणे चिमूर वरोरा रोड ने जाणे येणे करणे म्हणजे आजाराला निमंत्रण देण्या सारखे झाले आहे. कर्मचारी वर्ग, नागरिकांना, प्रवासी व शालेय विद्यार्थ्यांना खड्ड्यामुळे मानेचा व कमरेचा त्रास निर्माण होत असून त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे सगळ्यांना श्वसनाच्या त्रासाला समोरे जावे लागत आहे.

करिता या गंभीर समस्या कडे शासनाने तात्काळ लक्ष देऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे यासाठी अनेकदा निवेदन सुद्धा सादर करून आपली मागणी केली परंतु शासनाकडून या निवेदनाला कसल्याही प्रकारची हालचाल न होता या रस्त्याचे अर्धवटच काम अजूनही अर्धवटच आहे.

अशा अनेक संकटाला तोंड देत सामोर जावे लागत आहे तेव्हा या अनेक संकटापाई शेगाव बू . येथील तसेच परिसरातील जनता संतापलेली आहे .आज माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री यांना निवेदन दिले गडकरी साहेब यांनी निवेदनाची दखल घेत या रस्त्याचे अपूर्ण काम अर्धवट काम तात्काळ पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन हमी दिली व शेगाव परिसरातील जनतेचे तसेच शेतकऱ्यांना दिलासा दिला..