११ तारखेला प्रहार चे वरोरा चिमूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

 शेगाव बू (दि.8 डिसेंबर) :- वरोरा चिमूर महामार्गाचे काम गेल्या ५ वर्षा पासून संथ गतीने चालू असून अनेक नागरिकाचा मृत्यू या महामार्गाने रोज होत आहे.

       गेल्या ५ वर्षात अनेक निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या रोड बांधकाम करणाऱ्या कंपनीला देण्यात आले तरी या कंपनी प्रशासनला जाग कशी येत नाही असा प्रश्न या रोड नी ये जा करणाऱ्या नागरिकांना पडतो. या महामार्गावर नेहमी अपघाताचे सत्र चालूच असते त्याला कारण बनलेला अर्धवट रस्ता, पूल आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रतिनिधी या महामार्गा संदर्भात आपला मुद्दा सरकार ला का मनून मंडत नसेल की लोकप्रतिनिधी ला कंपनी प्रशासन चिरी मिरी देऊन गप्प ठेवत असेल असा प्रश्न नागरिक करत आहे.

     दोन दिवसाआधी गिरोला या गावातील नागरिकाचा या रोड वर अपघात होऊन आपला जीव गमवावा लागला वारंवार हे अपघाताचे सत्र कधीपर्यंत चालू राहणार याचा जॉब विचारण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षा च्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात शाळकरी मुले हे सुद्धा उपस्तिथ राहणार आहे अशी माहित प्रसारमाध्यमाशी बोलताना प्रहार चे जिल्हा अध्यक्ष शेरखान पठाण यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया :- 

शेरखान पठाण जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर

दोन दिवसाआधी गिरोला येथे नागरिकास आपला जीव गमवावा लागला त्याच्या घरच्यांना २० लाख रुपयाची मदत कंपनी प्रशासनानि तात्काळ त्यांना द्यावी धुरी मुळे शेतकराची नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी आणी रोड चे बांधकाम १ वर्षात पूर्ण करण्यात यावे असे लेखी आस्वासन आम्हाला देण्यात यावे तोपर्यत हा चक्काजाम शालेय विध्यार्थी गावकरी यांना घेऊन आम्ही करू.