उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दिव्याग (अपंग) यांना तपासणी करून प्रमाणपत्र वाटप शिबीर लावा प्रहारसेवक विनोद उमरे यांची मागणी

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर(दि .7 डिसेंबर) :- दिव्याग (अपंग) व्यक्ती यांना प्रमाणपत्र (अपंगांचा दाखला) काढण्यास चंद्रपूर येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात जाण्या-येण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो . त्या करीता उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दिव्याग (अपंग) यांना तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबिर लावण्यात यावे अशी मागणी प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केली आहे.

दिव्याग (अपंग) व्यक्ती यांना प्रमाणपत्र काढण्यासाठी चिमूर ते चंद्रपूर हे अंतर ८०-९० कि.मी. प्रवास करावा लागते आधीच ते कोणत्या ना कोणत्या अवयवाने अपंग असतात. त्यामुळे त्यांना व परिवारातील सदस्यांना त्रास सहन करावा लागतो.

त्या कारणास्तव उपजिल्हा रुग्णालय, चिमूर येथे वर्षातून किमान १-२ वेळा उपजिल्हा रुग्णालयात दिव्याग (अपंग) यांना तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबिर घेण्यात यावे अशी मागणी निवेदनातून प्रहार सेवक विनोद उमरे,सत्यपाल गजभे यांनी केली आहे.