दि. ६ ऑगस्ट रोजी वर्ध्याचे प्रसिध्द वक्ते प्रा. नितेश कराळे वरोऱ्यात date. On August 6, Wardhya’s famous speaker Prof. Nitesh Karale in warora

▫️स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर आणि म. रा. ग्रा.पत्रकार संघ वरोराचा संयुक्त उपक्रम(Self. Srinivas Shinde Memorial Ravindra Shinde Charitable Trust Chandrapur and Md. Res. Joint initiative of Gr. Journalist Sangh warora)

✒️ मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.4 ऑगस्ट) :- वरोरा येथील राधा मिलन सभागृह बोर्डा चौक वरोरा येथे दि. ६ ऑगस्ट रोज रविवारला सकाळी अकरा वाजता स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात वर्धा येथील वऱ्हाडी भाषेतील राज्यस्तरीय प्रसिद्ध वक्ते प्रा. नितेश कराळे  प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील. याप्रसंगी प्रा. नितेश कराळे  युवक -युवतींना  स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन करतील. यावेळी इयत्ता १० वी आणि १२ वी च्या  गुणवंत विद्यार्थांचा सत्कार, सी-टीव्ही  वरोरा लोकल  चॅनलचे उद्घाटन आणि उन्माद विषमतेचा या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात येईल.

       या कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांच्या शुभहस्ते करण्यात येईल. याप्रसंगी अध्यक्षस्थानी म. रा. ग्रा.पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापण, विशेष अतिथी जेष्ठ अधिवक्ता अँड. पुरुषोत्तम सातपुते, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना (उ.बा.ठा.) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, परिवर्तनवादी सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतूरे, आनंदवन वरोरा महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू , नागपूरच्या जेष्ठ कवियत्री शोभा वेले, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मुथा, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले आणि  ट्रस्टच्या विश्वस्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुषमा शिंदे उपस्थित राहतील.

    या कार्यक्रमात युवक, युवतीं, विद्यार्थी, विद्यार्थींनी, पालक आणि इतर बंधू-भगिनिंनी फार मोठया संख्येत सहभागी व्हावे असे संयुक्त आवाहन ट्रस्टचे कार्यवाहक वर्षा कुरेकार व अनुप कुटेमाटे, म.रा. ग्रा.पत्रकार संघ वरोराचे अध्यक्ष अशपाक शेख, ट्रस्टचे सचिव संजय तोगट्टीवार.

म.रा. ग्रा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष फैज पटेल, सचिव सुनिल शिरसाट, संघटक हितेन राजनहिरे, सहसचिव मुजहिद कुरेशी, कोषाध्यक्ष  विश्वदिप गोंडाणे, प्रसिध्दी प्रमुख अहेफाज शेख तसेच  जयहिंद फाउन्डेशचे अध्यक्ष माजी सैनिक विजय तेलरांधे, कॅप्टन विलास देठे, माजी सैनिक अजीत राम, माजी सैनिक प्रमोद गावंडे , विरपत्नी रजनी बावणे, मनिषा डोंगरे आणि रजनी घटे यांच्यासह माजी नगरसेवक  प्रशात कारेकर, प्रतिभा माडंवकर.

प्रा. प्रिति पोहाणे, प्रा. अश्लेषा जिवतोडे, रोहन कुटेमाटे, राहुल मालेकर, मनोज पापडे, उमेश काकडे, गौरव नागपुरे, अभिजीत कुडे, अनिल सिंग, निखील माडंवकर , शशिकांत राम, शुभम कोहपरे, रमेश ठावरी, सुजन माढरे, प्रणाली मडकाम, भावना खोब्रागडे, स्नेहा बनसोड, साक्षी रोकडे, शुभागी डाखरे, ट्रस्टचे कार्यवाहक गायत्री यमलावार आणि अक्षय बंडावार यांनी केले आहे.