विनोदी कलाकार एहसान कुरेशी यांचा माजरीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन 

300

🔹महाकाली जागरण कार्यक्रमाचे औचित्य साधून

✒️चंद्रपूर (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.4 फेब्रुवारी) :-  जिल्हातील भद्रावती तालुक्यातील माजरी येथे महाकाली मंडळ माजरी तर्फे दरवर्षी महाकाली जागरण निमित्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते . 

      यावर्षी सर्वांच्या परिचयाचे असलेले तसेच विनोदाचा बादशाह असलेले व आपल्या कवितेच्या माध्यमातून रसिकांना हसवून हसवून मनोरंजन करणारे टेलिविझन कलाकार एहसान कुरेशी यांचा धमाकेदार विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.चैतन्य कॉलनीच्या पाठीमागील मैदानात सार्वजनिक महाकाली मंडळ माजरी तर्फे 5 फेब्रुवारी रोजी महाकाली जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

        या जागरण कॉमेडी चित्रपटात अभिनेता एहसान कुरेशी माजरी याच्या आयुष्यावर हशा पिकणार आहे. तो देखील मुंबई बॉलीवूड अभिनेता आहे. तसेच मराठी अभिनेत्री निशा डोंगरे, चंद्रपूरचे गायक मुकेश कुमार आणि विकास दुपारे ArtistM च्या मनोरंजन संघासोबत येत आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक महाकाली मंडळ माजरी चे अध्यक्ष व्यंकटेश उर्फ ​​टोनी गडपल्लीवार (नर्तक) यांनी केले आहे. सेलिब्रिटींना पाहण्यासाठी गर्दी होणार असल्याने पोलिस बंदोबस्त असेल. माजरी येथील सार्वजनिक ठिकाणी हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.