नेहरु विद्यालय शेगाव येथे महात्मा फुले स्मृतीदिन साजरा

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू(दि.28 नोव्हेंबर) :- येथील नेहरु विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे महात्मा जोतिबा फुले स्मृतीदिन निमीत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक ढाकुणकर सर, प्रमुख पाहुने जेष्ठ शिक्षक लांजेवार सर, परिक्षा प्रमुख चांगले सर, कन्नाके सर उपस्थित होते.

कन्नाके यांनी महात्मा जोतिबा फुले यांचा जिवनपट विद्यार्थांना सांगीतला. या निमित्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन गिरडे सर यानी केले. या कार्यक्रमास शाळेचे शिक्षक जुमडे सर सोनवाने सर, कडुकर सर, हिवरकर मॅडम, आसुटकर मॅडम, व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.