✒️ शिरीष उगे वरोरा (Warora प्रतिनिधी)
वरोरा (दि.20 एप्रिल) :-
स्थानिक वरोरा येथील स्व. श्रावण बागडे माजी मुख्याध्यापक श्री संत तुकडोजी महाराज विद्यालय टेमुर्डा यांची सुकन्या कुमारी जया बागडे हीची एम. पि. एस. सी. मार्फत आर. एफ. ओ. वन विभाग पदी निवड झाल्या बद्दल वरोरा तालुका पेंशनर्स असोसिएनच्या च्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ ,पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला शिवाय पुढील वाटचाली साठी अनेक शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी श्री देवराव कांबळे , श्री पुंडलिक नन्नावरे , देवराव पारखी , सीताराम पाल ,प्रभाकर वाघ सौ मिरा वानखेडे ,सौ दुर्गा ठाकरे ,इत्यादी प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
