धक्कादायक बातमी…. अल्पवयीन मुलीवर अत्याचार

84

✒️चंद्रपूर.(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.24 फेब्रुवारी) :- पोलीस स्टेशन तळोधी बा.अंतर्गत येत असलेल्या ओवाळा येथील तरुण शुभम बाळकृष्ण मोहूर्ले वय २६ वर्षे याने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे उघड झाले. पीडित मुलीने ( वय 15 वर्षे ) पोलिस स्टेशन तळोधी बा.येथे तक्रार दिली की, तिची इन्स्टाग्रामवर आरोपीशी ओळख झाली . त्यातुन त्यांची मैत्री होवुन त्याने तिला लग्नाचे आमिष देऊन काल रोजी सिंदेवाही येथील एका लॉजवर नेऊन तिचे इच्छेविरुद्ध तिच्याशी अती प्रसंग केलेला आहे.

    अशा पीडितेच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन तळोधी येथे कलम 363,366A,376,376(2)(n),376(3),506 भादवी सहकलम 4,6 पोक्सो अंतर्गत गुन्हा करण्यात आलेला असुन ,आरोपीस ताब्यात घेवुन अटकेची कार्यवाही सुरू आहे.गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अजितसिंग देवरे करित आहेत.

लॉज मालकावर गुन्हा दाखल होणार काय? सिंदेवाही व परिसरातील काही लॉजवर पैशाच्या हव्यासापोटी बिनधास्तपणे अल्पवयीन मुलींना एन्ट्री दिली जाते. अशा लॉज मालकांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.