शेतकऱ्यांच्या नशिबी हिथ भर सुख अन् हातभर दुःख हा अन्याय कधीपर्यंत सहन करावा 

🔸युवा शेतकरी विनोद उमरे यांचा सवाल

🔹शेतकऱ्याचा कापूस सोयाबीन मार्केटमध्ये विक्रीसाठी आला की भाव कमी का होतात ?

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.3 नोव्हेंबर) :- कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांना धरून विविध डाव रचले जात आहेत.या प्रत्येक डावात शेतकरीच बळी ठरत आहे. गेल्या महिनाभरापूर्वी जेव्हा शेतकऱ्याकडे कापूस न होता सोयाबीन नव्हती तेव्हा मात्र.५हजार रुपये भाव सोयाबीनला होता.परंतु आता शेतकऱ्यांची सोयाबीन मार्केटमध्ये आल्यामुळे सोयाबीनचे भाव कमी होताना दिसत आहेत ४००० ते ४२०० रुपये अशीच.परिस्थिती कापूस भाव मध्ये झालेली आहे. शेतकऱ्याच्या शेतातील कापूस वेचणी चालू असून.शेतकरी विकण्याच्या तयारीत असताना आता मात्र शेतकऱ्यांच्या कापसाला कवडीमोल भाव होताना दिसत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नखभर सुख अन् हातभर दुःख अशी परिस्थिती राज्य व केंद्र सरकारने केली आहे. असे शेतकरी नेते विनोद उमरे यांनी म्हटले आहे.आज परिस्थिती पाहता शेतकरी हा अगोदरच पाऊस कमी पडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करताना दिसत आहे परंतु राज्य सरकारने केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या शेतातील माल विक्री करण्यासाठी आल्यानंतर मात्र शेतीमालाचे भाव कमी होताना दिसत आहेत सध्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन कापूस विक्रीसाठी आलेले आहेत‌.

परंतु आज त्या मालाला योग्य भाव लागताना दिसत नाही जेव्हा शेतकऱ्याच्या शेतातील कापूस सोयाबीन मार्केटमध्ये आले नव्हते तेव्हा मात्र त्याला मोठ्या प्रमाणात भाव होता परंतु आज परत पाहता शेतकऱ्याच्या शेतातील विक्रीसाठी आलेला कापूस सोयाबीन याला मात्र कोडीमोल भाव होताना दिसत आहे.शेतकऱ्यावर राज्य व केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात अन्याय होताना दिसत आहे.आज पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील असलेले पीक ही वायाला गेलेले आहे.

थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्याच्या शेतातील आलेले कापूस सोयाबीन विकण्यासाठी शेतकरी मार्केटमध्ये घेऊन जात आहे.परंतु आज गेल्या महिन्याभरापूर्वी असलेल्या भावांमध्ये तफावत आहे.आज कापूस सोयाबीनचे भाव कमी झालेले आहेत जेव्हा शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस व सोयाबीन उपलब्ध नव्हते मार्केटमध्ये तेव्हा मात्र शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मोठ्या प्रमाणात होता.

परंतु आता शेतकऱ्याचा शेतीमाल मार्केटमध्ये विक्रीसाठी आल्यानंतर मात्र शेतकऱ्याला कवडीमोल विकावा लागत आहे. ही बळीराजाची खूप मोठ्या प्रमाणात थट्टा केंद्र व राज्य सरकार करताना दिसत आहे शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेले आहेत शेतकऱ्याला जोपर्यंत योग्य भाव मिळत नाही. शेतीमालाला तोपर्यंत शेतकरी सुखी राहणार नाही आज परिस्थिती पाहता शेतकऱ्याच्या शेतातील असलेला कापूस सोयाबीन हे वेचून विकण्यासाठी मार्केटमध्ये आलेला आहे.

परंतु आज व गेल्या महिन्याभरापूर्वी असलेल्या भावांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत आहे. याचा अर्थ असा की राज्य व केंद्र सरकार हे शेतकऱ्याविरोधी धोरण करत आहे काय? का शेतकऱ्यांचं वाटोळे करण्यात केंद्र व राज्य सरकारला रस आहे का?असा प्रहार सेवक तथा शेतकरी नेते विनोद उमरे यांनी केला आहे.