चंदनखेडा येथे 5,6,7,8 चारदिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन

52

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि. 4 नोव्हेंबर) :- जिल्ह्यात तसेच भद्रावती तालुक्यात नामांकित असलेल्या चंदनखेडा या गावामध्ये नागरिकांच्या सेवे करिता दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री छत्रपती युवा मंडळ चंदनखेडा यांच्या वतीने दिनांक 5,6,7व 8 अश्या चार दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

असून यात सकाळी 6वाजता ग्राम स्वच्छता अभियान , ८ वाजता फळबाग वृक्षारोपण लागवड कार्यक्रम , व सकाळी 11 वाजता भव्य रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे .

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.श्री अनिल भाऊ धानोरकर माजी नगराध्यक्ष भद्रावती, सह उद्घाटक मा. श्री सुधीर भाऊ मुळेवार सामाजिक कार्यकर्ता चंदनखेडा, अध्यक्षस्थानी मा. श्री नयनभाऊ जांभुळे सरपंच ग्रामपंचायत चंदनखेडा, प्रमुख अतिथी म्हणून मा .श्री अनिल चौधरी संचालक कृ. उ. बा. स. भद्रावती, तसेच मा.श्री. डॉ. देवाशिष ससाणे वैद्यकीय अधिकारी चंदनखेडा , इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे व रात्रौ 9 वाजता सामाजिक, सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करते लोकरंग नाट्यकला संगीतमय प्रबोधन मंच भद्रावती

     दिनांक 6 तारखेला रोगनिदान शिबिर व महिला विशेष कार्यक्रम रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा सकाळी 11 वाजता हळदी कुंकवाचा कार्यक्रम व मार्गदर्शन कार्यक्रम दुपारी 2 वाजता संगीत खुर्ची स्पर्धा इत्यादी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांकरिता अल्पहाराची व जेवणाची व्यवस्था सौ. स्नेहलताई मुळेवार यांच्याकडून करण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता महिला कबड्डी सामने व सायंकाळी 6 वाजता पुरुष कबड्डी सामने घेण्यात येणार आहे.

      दि.7 तारखेला सकाळी आठ वाजता मॅरेथॉन स्पर्धा व 9वाजता पुरुष व महिला कबड्डी सामने

     दि.8 तारखेला रात्रौ आठ वाजता समाज प्रबोधनपर कीर्तनाचा कार्यक्रम सुप्रसिद्ध समाज प्रबोधन सप्त खंजिरी वादक मान.श्री सत्यपाल महाराज यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे अशा चार दिवसीय चालणाऱ्या विविध सामाजिक कार्यक्रमात गावकऱ्यांनी तसेच परिसरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री सुधीर भाऊ मुळेवार यांच्यासह चंदनखेडावासिय तसेच ग्रामपंचायत कार्यालय चंदनखेडा यांनी केले आहे.