स्वराज्यक्रांती सेवा संघा चे संस्थापक अंकुश कुमावत यांचा महर्षि वाल्मीकि राष्ट्रीय गौरव २०२३ ने सन्मान

✒️नाशिक(Nashik विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

नाशिक(दि.3 नोव्हेंबर) :- एकता फाउंडेशन संघटन व ग्लोबल एकता मिडीया न्युज तसेच एकता जय निधी लिमिटेड नागपुर महाराष्ट्र यांच्या सौजन्याने स्वराज्यक्रांती सेवा संघ महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष शिवभक्त अंकुश भाऊ कुमावत यांना महर्षि वाल्मीकि राष्ट्रीय गौरव सन्मान २०२३ देवुन त्यांचा सन्मान करण्यात आला.

       महर्षि वाल्मीकि यांची जयंती २८ ऑक्टोबर रोजी होती, त्यांच्या जयंती निमित्त सन्मान सोहळा राष्ट्रीय स्तरावर ऑनलाईन आयोजित करण्यात आला होता. 

    स्वराज्यक्रांती सेवा संघ महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष शिवभक्त अंकुश कुमावत अनेक वर्षांपासुन सामाजिक क्षेञात आहेत, वेळो वेळी ते गोर गरिबांच्या व अनाथ, अंध अपंगाच्या मदतीसाठी धावुन जातात त्यांच्या ह्या उल्लेखनिय कार्याचा आढावा घेवुन एकता फाउंडेशन चे संस्थापक डॉ. जय संजय रामटेके यांच्या नेतृत्वाखाली हा गौरव करण्यात आला असे अंकुश कुमावत यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.