सांस्कृतिक कार्यक्रमतुन विद्यार्थ्यांचे सुप्त गुण दिसतात..श्री चिकटे शिक्षक

✒️ वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.29 जानेवारी) :- दर वर्षी प्रत्येक शाळा , विद्यालय , महाविद्यालयात , मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम तसेच संखिक खेळाचे आयोजन करण्यात येथे तत्परवी हे कार्यक्रम विद्यार्थ्यासाठी महत्वाचा विषय यातून प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये दडलेले सुप्त गुण कला ,कौशल्य दिसतात.

या सुप्त गुणाला वाव देण्याकरिता असे कार्यक्रम गरजेचे आहे .असे मत सेवा निवृत्त शिक्षक श्री विनोद चिकटे यांनी विद्यार्थ्या समोर प्रकट केले .दिनांक २४ ते २७ जानेवारी २०२३ या कालावधीत राजीव गांधी विद्यालय, खेमजई त.वरोरा येथे विविध शालेय खेळ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे संपन्न झाले.

श्री.विनोद जी चिकटे सर यांचा व त्त्यांच्या सौभाग्यवती सौ.रंजना विनोद जी चिकटे यांचा सेवा निवृत्तीपर सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान.सौ.मनीषा ताई चौधरी सरपंच तर उद्धघाटक श्री.चंद्रहास मोरे उपसरपंच ग्राम पंचायत खेमजई हे होते.

प्रमख उपस्थिती श्री.डॉक्टर.प्रमोदजी गंपावार, श्री.रमेशभाऊ बावणे,श्री.शत्रुघ्न शेरकुरे, अशोक दडमल , धनपाल चौधरी , तंटामु्तीचे अध्यक्ष , शंकर धोतरे , विलास चौधरी , नत्थुजी घरत इत्यादी उपस्थित होते सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.वशिष्ठ पेटकर सर तर आभार प्रदर्शन श्री.भिमराव पाटील सर यांनी केले.

संस्थेचे अध्यक्ष श्री.पुरुषोत्तमजी खिरटकर तसेच संस्थेचे सचिव श्री. राजुजी पारोधे सर यांनी मार्गदर्शन केले. या सर्व कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक श्री.मडावी सर,तशेच घडले बाबू,श्री.नंदकिशोर नवघरे,श्री. लभाणे यांनी सहकार्य केले.