शिवाजी महाराजांचे विचार गावा गावात पोहचविणे काळाची गरज- प्रदीप महाकुलकर It is the need of the hour to bring the thoughts of shivaji maharaj to every village – pradeep mahakulkar

✒️ मनोज कसारे भद्रावती(Bhadravti प्रतिनिधी) 

भद्रावती(दि.11 मार्च) : -महाराष्ट्राचा जाणता राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथी नुसार तालुक्यातील टाकळी येथे मोठ्या थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्राचे लोकार्पन सोहळा पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पानवडाळा गावचे सरपंच तथा अखिल भारतीय सरपंच संघटना तालुका अध्यक्ष प्रदीप महाकुलकर हे होते. उदघाटक म्हणून नंदोरी ग्रामपंचायत चे उपसरपंच मंगेश भोयर हे उपस्थितीत होते.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यादव ढेंगळे,ग्राम पंचायत सदस्य प्रवीण देऊळकर, योगिता बल्की , माधुरी सोनटक्के, संजय आसुटकर, प्रमोद दरेकर, तंटामुक्ति समिती अध्यक्ष मनोज बलकी, माजी पोलीस पाटील ईश्वर पेटकर, वामन झाडे आदी मंचावर उपस्थित होते.

उदघाट्नीय भाषणामध्ये मंगेश भोयर ह्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे विचार तरुणांसाठी प्रेरणादायी आहे आणि ते आत्मसात करण्याची वेळ आलेली आहे असे आव्हान केले. तसेच अध्यक्षीय भाषणामध्ये प्रदीप महाकुलकर ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार गावागावामध्ये पोहचवून तरुणांना जागृत करण्यासाठी एकत्रित येऊन काम केले पाहिजे असे मार्गदर्शन केले.त्या नंतर लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता सतीश देऊळकर, प्रफुल दुरुडकर, वृषभ परचाके, प्रमोद दरेकर, सुभाष मुसळे, महेश डोळस, सुधाकर दानव आणि शिवाजी महाराज प्रतिष्ठान टाकळी च्या सर्व सदस्य आणि गावाकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.