बेरोजगार युवांसाठी सर्वकष धोरण तयार करा: किशोर टोंगे यांची मागणी

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.21 ऑक्टोबर) : – राज्यशासनाने कंत्राटी भरतीचा जीआर रद्ध केल्याचे स्वागत आहे. पण या निर्णयानी तरुणांनी अधिक आनंदीत होण्याची आवश्यकता नाही. कारण शासनाने तरुणांची अप्रत्यक्षपणे चाचपणी घेतली आहे. या कंत्राटी भरतीमुळे तरुणांमध्ये असेलेली तीव्रता व दाहकता शासनाच्या लक्षात आली त्यामुळे हा निर्णय झाला आहे.

येत्या पूढील काळात पदभरतीचे अनेक प्रश्न ऐरणीवर येणार असून याबाबत शासनाकडे कुठलेही ठोस धोरण दिसून येत नाही. त्यामुळे खाजगी व सरकारी क्षेत्रातील निर्माण होणाऱ्या नोकऱ्या, लघु उद्योग, कौशल्य विकास आणि तरुणांसाठी उद्योगात प्रोत्साहन देणाऱ्या एकूण योजना आणि त्यातून होणारी मनुष्यबळ भरती यासह त्याच वेळापत्रक देणारं सर्वंकष धोरण तातडीने तयार करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे युवा उमेदवार किशोर टोंगे यांनी केली.

 

राज्यात सुरु असलेली राजकीय अस्थिरता, सामाजिक गूतांगूतीचे प्रश्न, आरक्षणाचा पेच अशा विविध कारणामूळे या भरती प्रक्रीया निवडणुकीनंतर पुन्हा आपल्या समोर घेउन हे सर्वपक्षीय लोक येतील. तसे आश्वासन देखील आपल्याला देतील त्यामुळे तरुणांनी सतर्क राहून दीर्घाकालीन धोरण आखण्यास व अंमलबजावणी करण्यास भाग पाडावे असे आवाहन त्यांनी केले.

कंत्राटी भरती आणि बेरोजगारी याचे खापर सत्ताधारी विरोधक ऐकामेकांवर आता टाकतील, त्यामुळे या तकलादु धोरणाच्या विरोधात आपण कायमच राहीले पाहीजे आणि युवकांच्या भल्यासाठी एक कायमस्वरूपी धोरण तयार करण्यास सरकाला बाध्य केलं पाहिजे अशी भूमिका किशोर टोंगे यांनी मांडली.