अभिजीत कुडे यांच्या 2 वर्षाच्या संघर्षाला यश, उखर्डा ते नागरी रस्त्याच्या कामाला सुरुवात 

✒️वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.20 ऑक्टोबर) :- तालुक्यातील उखर्डा ते नागरी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. गेल्या 2 वर्षापासून अभिजित कुडे यासाठी संघर्ष करत होते. अनेक निवेदन देवून आंदोलन केले सतत पाठपुरावा करत अखेर कामाला मंजुरी मिळाली पण कामाचा श्रीगणेशा होत नव्हता त्यासाठी अभिजित कुडे यांनी आक्रमक भूमिका घेतली त्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या रस्त्याची दुर्दशा झाली होती जनता त्रस्थ झाली होती त्यासाठी अभिजित कुडे यांनी प्रशासनाला धारेवर धरले, रान पेटवले अखेर त्यांच्या संघर्षाला यश आले. या साठी त्यांनी 2 वर्षात 4 पण तहसीलदार यांना निवेदन दिले.

बांधकाम विभागाला सळो की पळो करून सोडले रस्त्यातील खड्डय़ात झाडे लावा आंदोलन, भजन आंदोलन, झोपा काढा आंदोलन, निषेध आंदोलन, रस्त्यातील खड्ड्यांचे नामकरण आंदोलन, दिवाळीत दिवे लावा आंदोलन असे आंदोलन करत प्रशासनाला जागे केले त्या नंतर सतत पाठपुरावा करत राहिले अखेर त्यांच्या कार्याला फळ मिळाले. अभिजीत कुडे यांनी कोणतेही काम हाती घेतल्यास ते पूर्ण केल्या शिवाय थांबत नाही . त्यांचे आंदोलन हे नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. अभिनव आंदोलन करून त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले शिवाय सतत पाठपुरावा केला. एकाद्या परिपक्व नेत्याला लाजवेल असा आलेख त्यांच्या कामाचा आहे ,जिद्दी आणि आक्रमक पवित्रा असल्यामुळे त्यांचे काम लवकर होते. तालुक्यातील 25 ,26 रस्त्यासाठी त्यांचा संघर्ष अजून पर्यंत सुरू आहे.

सर्व सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी कोणत्याही प्रकारची आक्रमक भूमिका घ्यावी लागली तरी लोकाना न्याय मिळवून देऊ असे त्यांचे काम आहे. परिसरातील लोकानी अभिजित चे व त्याच्या सहकार्याचे आभार मानले. तालुक्यातील सर्व रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे त्यासाठी संघर्ष चालू आहे त्यांना पण लवकरच यश मिळणार . तसेच जे रस्ते मंजूर झाले आहेत त्यांचे तात्काळ काम सुरू करावे अशी विनंती अभिजित कुडे यांनी केली.