संजय गांधी योजनेतील लाभार्थी चार महिन्यापासून अनुदाना विना

47

✒️वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.10 ऑक्टोबर) :- तालुक्यातील संजय गांधी योजनेचे अनेक नागरिक आजही या योजनेपासून वंचित असून यांना शासनाचा लाभ अजून पर्यंत मिळालेला नाही करिता हा लाभ तात्काळ वृद्ध महिला पुरुष यांना देण्यात यावा करिता हजारो नागरिक तहसील कार्यालयात श्री राजूभाऊ चिकटे यांच्या मार्गदर्शन कार्यालयात धडकले . सविस्तर असे की .

शेकडो लाभार्थी तहसील कार्यालयावर धडकले

वरोरा वरोरा संजय गांधी निराधार योजनेचा लाभ तालुक्यातील शेकडो या योजनेतील लाभार्थ्यांना मागील चार महिन्यापासून अनुदान मिळाले नाही अनुदान मिळावे या मागणी करिता शेकडो लाभार्थी तहसील कार्यालयावर धडकले.

संजय गांधी निराधार योजनेत गोरगरीब कुटुंबातील लाभार्थी आहे सदर योजनेत केंद्र शासन व राज्य शासन अनुदान देत असते मागील जून महिन्यापासून आज पावतो लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नसल्याने लाभार्थ्यांची अवस्था मोठी बिकट झाली आहे .

अनुदान केव्हा मिळेल याकरिता लाभार्थी तहसील कार्यालयाचे उंबरटे झीजवीत आहे परंतु त्यांना समर्पक उत्तर मिळत नाही ग्रामीण भागातून वरोरा शहरात येऊन अनुदानाबाबत विचारणा करण्याकरिता येणाऱ्या प्रवासाचा खर्चही सोसावा लागत आहे या लाभार्थ्यांची दिवाळी अंधारात जाईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

थकीत अनुदान द्यावे व अनुदान दर महिन्याला वेळेवर देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली यावेळी तहसीलदार योगेश कोटकर यांना बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक राजेंद्र चिकटे इंदिरा काँग्रेस तालुकाध्यक्ष मिलिंद भोयर पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र धोपटे व लाभार्थ्यांनी निवेदन दिले.