लोकप्रतिनिधी च्या वेतनात घट नाही.पण सोयाबीनच्या भावात सतत घसरण शेतकरी राजा हवालदिल 

🔸शेतकरी पुत्र विनोद उमरे मोठी खंत व्यक्त केली

🔹कृषी प्रधान देशात चाले तरी काय

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.9 जानेवारी) :- मागील वर्षी पासून सोयाबीन ५ हजार १०० ते ५ हजार २०० रुपये भाव आहे.तर या वर्षाला सोयाबीन मालाला चांगला भाव मिळतील अशी अपेक्षा शेतकरी राजाला होती.तर जनतेचे सेवक असलेले लोकप्रतिनिधी मात्र यांच्या वेतनात मोठी वाढ होते आहे. महागाई फक्त लोकप्रतिनिधी व सरकारी कर्मचारी यांच्यावरच येते काय? शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव नाही.त्यामुळे शेतकरी राजा हावालदिल झाला आहे.मागील‌ वर्षी सोयाबीनला ५ हजार १००ते ५ हजार २०० रुपये भाव होता.

मात्र या वर्षाला चांगला भाव मिळतील अशी अपेक्षा होती .त्यात पुन्हा मोठी घसरण ४ हजार ४०० रुपये आले आहे. त्यामुळे देशातील महाराष्ट्रातील सह चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन योग्य भाव मिळत नाही.मात्र दर टप्याटप्याने कमी होत‌ गेल्याने शेतकरी राजा हवालदील झाला आहे.लोकप्रतिनिधी च्या वेतनात घट नाही.सोयाबिन च्या भावात मोठी घट होत असल्याने शेतकरी पुत्र प्रहार सेवक विनोद उमरे मोठी खंत व्यक्त केली आहे.