राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्षपदी गितेश सातपुते 

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.8 ऑक्टोबर) :- शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजीत पवार गट) भद्रावती शहर अध्यक्षपदी गितेश वसंता सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने गितेश सातपुते यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भद्रावती शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी गितेश सातपुते यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करत नियुक्तीचे पत्र दिले आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या विचारानुसार पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या विकासात भरीव कार्य करून पक्ष संघटना मजबूत करणार असल्याचे मत नवनियुक्त शहराध्यक्ष गितेश सातपुते यांनी यावेळी व्यक्त केले. निवडीबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजीत पवार गट) पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.