वरोऱ्याची ईश्वरी राऊत महाराष्ट्र व्हॉलीबॉल शालेय संघात

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा(दि.5 ऑक्टोबर) :- लोक शिक्षण संस्था, वरोरा अंतर्गत येणाऱ्या लोकमान्य इंग्लिश मीडियम हायस्कूल वरोरा येथील नववीची विद्यार्थिनी कु. ईश्वरी विलास राऊत हिची तामिळनाडू येथे होणाऱ्या 17 वर्षाखालील मुलींच्या शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य संघात निवड झालेली आहे.

नुकत्याच बोईसर जिल्हा पालघर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य शालेय राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ईश्वरी ने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून महाराष्ट्र संघात स्थान पटकाविल्यामुळे वरोरा शहरात सर्वत्र तिचे कौतुक करण्यात येत आहे.

ईश्वरीच्या निवडीबद्दल लोक शिक्षण संस्था वरोडाचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत जी पाटील, उपाध्यक्ष श्रीकृष्ण जी पाटील, कार्यवाह विश्वनाथ जोशी, ॲड. दुष्यंत जी देशपांडे. लोकमान्य इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक संजय अंबुलकर, वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन चे अध्यक्ष गजानन जीवतोडे, विनोद उंमरे, मिलिंद कडवे, राजेश मते, हेमंत घिवे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी अभिनंदन केले.

ईश्वरी ने आपल्या यशाचे श्रेय जेष्ठ मार्गदर्शक सुनील बांगडे, निखिल बोबडे, प्रा. उत्तम देऊळकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप उईके, त्याचप्रमाणे लोक शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना तसेच वरोरा स्पोर्टस फाउंडेशनच्या जेष्ठ खेळाडूंना दिले.