शेगाव ते दादापुर रस्त्याचे डांबरीकरण तात्काळ करा

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.5 ऑक्टोबर) :- स्थानिक शेगाव बू ते दादापुर हा मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची मलमपट्टी न झाल्याने या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने दररोज रात्रौ बेरात्री या रस्त्यावर छोटे मोठे अपघात नक्की च होत असते. उखडलेल्या गिट्टी मुले दुचाकी चालवणे तसेच पायदळ चालणे कठीण झाले आहे .शेगाव , दादापुर , मानोरा , कारेगाव , आष्टा , सोनेगाव , खुटवडा , अंधारी व्याघ्र प्रकल्पात जोडल्या जातो या मार्गावरून अनेक प्रवासी पर्यटक वाहने दररोज मोठ्या संख्येने धावत असतात.

                 तर याच सोबत आष्टा खुटवंडा करेगाव मानोरा , येथील विद्यार्थी दररोज सायकल , पायदळ ,शेगाव येथे पाच ते दहा , दहा ते बारावी , शिक्षणासाठी विद्यार्थी दररोज मुल मुली येत असतात. तर या मुलांना दररोज ये जा करीत असताना मोठा मानसिक शारीरिक , तसेच आर्थिक नुकसानीचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

तेव्हा किमान विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार लक्षात घेऊन शेगाव बू ते दादापुर ह्या मार्गाची तात्काळ डागडुजी करून डांबरीकरण करण्यात यावे . याच सोबत शेगाव बू ही मोठी बाजार पेठ असल्याने शेतकरी शेतमजूर नागरिक यांना शैशनिक आरोग्य जीवनावश्यक वस्तू तसेच शेतकऱ्याची धान्याची खरेदी विक्री करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना लागणाऱ्या बि बियाणे शेती संबधित अवजारे या साठी शेतकऱ्यांना देखील इथेच दररोज यावे लागते.

तेव्हा शेतकरी शेतमजूर विद्यार्थी मुला मुलींची समस्या विचारात घेऊन हा मार्ग तात्काळ डांबरीकरण प्रवाशांसाठी सुख सोईचा बनवावा.. या करिता येथील भाजपा चे कार्यकर्ते मा.श्री . बाबा भागडे माजी नगरसेवक वरोरा , शेगाव येथील युवा कार्यकर्ते श्री सचिन नरड, राजूभाऊ बच्चुवार, रमेश मानकर सर , ईश्वर नरड, अजय लोडे , मोरेश्वर नन्नवरे , तसेच सर्व कार्यकर्त्यांनी मान. श्री . सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री वने, सांस्कृतिक कार्य. मस्य व्यवसाय महाराष्ट्र मंत्रालय मुंबई यांना निवेदन सादर करून मागणी केली आहे.