विकासात भद्रावती शहर आदर्श ठरेल- आ. प्रतिभा धानोरकर

🔸भद्रावती येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

✒️ मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.5 ऑक्टोबर) :- भद्रावती नगर परिषदेने संपूर्ण विदर्भात विकास कामात एक आदर्श ठेवला आहे. त्या विकास कामात आमची नेहमी आर्थिक मदत असून भद्रावती शहरात विकास कामात कोणतीही उणीव राहू देणार नाही व भद्रावती शहर विविध विकास कामात संपूर्ण विदर्भात एक आदर्श मॉडेल ठरेल असे प्रतिपादन भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.

भदावती शहरात नगरपरिषद अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन तथा विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला त्यात त्या बोलत होत्या .यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी विशाखा शेळकी ,न .प .उपाध्यक्ष संतोष आमने, नगरसेवक प्रफुल चटकी ,सुधीर सातपुते, चंद्रकांत खारकर, विनोद वानखेडे, अजित फाळके ,प्रमोद नागोसे, रेखा कुटेमाटे, सरिता सूर, जयश्री दातारकर, लीला ढुमणे, शितल गेडाम ,अनिता मृळे, प्रतिभा सोनटक्के, कविता सुफी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांचे शुभहस्ते अग्निशमन निवासी इमारतीचे लोकार्पण, अत्याधुनिक अग्निशमन वाहनाचा, पुरातन वास्तू संग्रहालयाचे लोकार्पण यासोबतच शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, गवराळा परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथचे भूमिपूजन, वेकोलीच्या चारगाव एकता नगर ते विजासन रेल्वे फाटक पर्यंतच्या रस्ता डांबरीकरणाचे भूमिपूजन व गौतम नगर येथील विकास कामाचे भूमिपूजन पार पडले.

भविष्यात भद्रावती शहरात निरंतर विकास कामे होत राहील व भद्रावती शहर हे संपूर्ण विदर्भात विकास कामांमध्ये लक्षणीय ठरेल असे आश्वासन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी यावेळी दिले. यासोबतच भद्रावती शहरात येणाऱ्या पर्यटकांनी शहरातील ऐतिहासिक स्थळांसोबतच नगरपरिषद द्वारा निर्मित केलेल्या पुरातन वस्तुसंग्रहालयात ला आवर्जून भेट द्यावी असे आवाहन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले.

ज्या विकास कामांचे भूमिपूजन झाले आहे, त्या विकास कामांना लवकरच सुरुवात होईल व शहरातील नागरिकांना सुविधा मिळेल असे यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाला काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते,नगरपरिषद कर्मचारी तथा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.