दुचाकी झाडावर आदळून तरुणाचा अपघाती मृत्यू

99

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू(दि .3 ऑक्टोबर) :- वरोरा तालुक्यातील शेगाव (बु) येथील येथील राहुल बंडू क्षीरसागर हा २४ वर्षीय तरुण आज दुपारी १२ च्या सुमारास हिरो होंडा कंपनीच्या फ्याशन प्रो या दुचाकीने बहिणीच्या गावाला जाण्यासाठी घरून निघाला. दुपारी ३ वाजता दुचाकी वरील नियंत्र सुटल्याने सदर तरुणाचा वरोरा खांबडा कडून बरवा जाणाऱ्या रोडच्या बाजूला झाडावर दुचाकी आदळून जागीच मृतु झाल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली.

घटनेची माहिती वरोरा पोलिसाना मिडताच त्यांनी मोका पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदणासाठी वरोरा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आला. व पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.राहुलच्या अशा आकस्मित जाण्याने कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून राहुल च्या मागे त्याची पत्नी, ३ वर्षाचा मुलगा, त्याचे आई वडील असा मोठा परिवार आहे.