🔹पाच दिवसात दुसरी कारवाई : तिघाना अटक (Second action in five days: Three arrested)
✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.13 जून) :- आयचर वाहनात कोंबून कत्तलीसाठी नेणाऱ्या 37 जनावरांची सुटका करुन पडोली पोलिसांनी दोघांना अटक केली. गुरुवारी मध्यरात्री एम आय डी सी चिंचाला येथे नाकाबंदी करुन पोलिसांनी ही कारवाई केली.
1)शेख बशीर शेख लतीफ (27), रा. गोयेगांव ता वाकडी जी. असीफाबाद
2)अयास खान एजाज खान (19)
3)शमशाद जैनुद्दीन शाहा (30) दोघेही रा. गडचांदूर
असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. तर शाकिर सुलेमान शेख , जुबेर रा. गडचांदूर साजिद रज्जाक कुरेशी रा. रयतवारि चंद्रपुर हे फरार असून त्याचा शोध सुरु आहे. या कारवाईत सुमारे सत्ताविस लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आयचर वाहनात कोंबून कत्तलीसाठी जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती पडोली पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी लगेच एम आय डी सी चिंचाला येथे नाकाबंदी केली. दरम्यान संशयित वाहन आयचर क्र. एमएच 34, बी जी 8994 येताच पोलिसांनी वाहन थांबविले. वाहनाची तपासणी केली असता वाहनात जनावरे कोंबून दिसून आले.
पोलिसांनी वाहनचालक व वाहक या दोघांना अटक केली तरआयचर गाड़ीचा पायलाटिंग करिता असलेली स्विफ्ट गाडी क्र. एम एच 34 ए ए 3703 चा चालक मिडाला असुन 03आरोपी पोलिसांना पाहून फरार झाले.. पोलिसांनी जनावरांसह सत्तावीस लाख 30 हजार रुपया चा मुद्देमाल रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार यांच्या नेतृत्वात कैलास खोब्रागड़े, सुमीत बरडे, प्रतिक हेमके, पंकज किटे, धिरज भोयर, कोमल मोहजे किशोर वाकाटे, यांच्यासह पडोली पोलिसांच्या चमूने केली.
