माऊंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

✒️ मूल (Mul विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

मूल(दि .2 ऑक्टोबर) :- माऊंट कॉन्व्हेन्ट अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविदयालय मूल येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रिमा कांबळे प्राचार्य माउंट कॉन्व्हेन्ट मूल तर विशेष अतिथी म्हणून रितेश मारकवार प्राचार्य कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय मूल हे होते.

या निमित्याने शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

पाहुण्यांनी महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांच्या जीवनावर भाषणातून प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन वामन कवाडकर तर आभार प्रदर्शन गोपाळ महाडोले यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.