महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.2 ऑक्टोबर) :- नेहरु विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेगाव बूज येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक ढाकुणकर सर प्रमुख पाहुणे श्री खेडीकर, श्री चांगले, श्री शंभरकर, श्री लांजेवार, श्री मत्ते सौ वरभे हे होते.

कार्यक्रमात अनेक विद्यार्थांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री विषयी आपले विचार भाषनाद्वारे मांडले. भाषण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनात्मक बक्षीस बुक आणि पेन देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन कु आसुटकर यांनी केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तथा भरपुर विद्यार्थी उपस्थित होते.