चंदनखेडा येथे महात्मा गांधी जयंती निमित्त शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्तांचा सामाजिक कार्याचा गुणगौरव व सत्कार समारंभ संपन्न

🔸महात्मा गांधी तंटामुक्त समिती चंदनखेडा यांचा उपक्रम

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.3 ऑक्टोबर) :- भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्तांचा कर्मविर सभागृह चंदनखेडा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रथम सकाळी महात्मा गांधी जयंती औचित्य साधून गावातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्या नंतर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नेहरू विद्यालय, शासकीय आश्रमशाळा चंदनखेडा च्या शालेय विद्यार्थ्यांची भव्य मिरवणूक शाळा परिसर ते गांधी चौक येथे महात्मा गांधी पुतळा पुजन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडले . त्या नंतर मिरवणूक कर्मविर सभागृह कार्यक्रम स्थळी आगमन झाले. लगेच कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे उद्घाटन अमोल कोल्हे उप पोलिस निरीक्षक भद्रावती यांच्या हस्ते पार पडले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष नयन जांभुळे सरपंच, कार्यक्रमाचे मार्गदर्शन अविनाश मेश्राम  उप पोलिस निरीक्षक,शेगांव, यांनी शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षा विषयी मोलाचं मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून दुर्गा केदार पोलिस पाटील चरुर, अर्चना नागरकर पोलिस पाटील, बोरगांव (धा), उपसरपंच भारती उरकांडे उपस्थित होत्या. सत्कार व गुणगौरव सोहळ्याचे मानकरी खालील 

 मुन्नाभाऊ शेख व्यवस्थापक सि,डी,सी,सी, बॅंक चंदनखेडा, डॉ. जगदिश बोढे, वैद्यकीय सेवा चंदनखेडा , सुषमा भालेराव, अंगणवाडी सेविका, श्रीमती हिरकणाबाई केदार, अंगणवाडी सेविका,चरुर (धा),सुशिला एकरे अंगणवाडी सेविका बोरगांव धा),मिना देशपांडे, अंगणवाडी सेविका, रिंगणे सर शासकीय आश्रमशाळा, मधुकर चौधरी नेहरू विद्यालय, साधना धाईत मुख्याध्यापिका जिल्हा परिषद शाळा, स्व.काशिनाथ पंपणवार गुरुदेव सेवा मंडळ मरणोत्तर सत्कार मुलगा सुनील पंपणवार,

स्व.माया सुरेश कुळसंगे मरणोत्तर सत्कार सुरेश कुळसंगे, शेख बशीर शेख मोहम्मद ग्रामपंचायत कर्मचारी, मारोती दोहतरे ग्रामपंचायत कर्मचारी,छाया बेलगे जिल्हा परिषद शाळा या सर्व सेवानिवृत्त शासकीय व निमशासकीय पदाधिकारी यांचे उपस्थित पाहुणे मंडळींच्या हस्ते सत्कार समारंभ गुणगौरव करण्यात आला.

मोफत आरोग्याची शारीरिक तपासणी सुद्धा कार्यक्रम स्थळी पार पडली.शिक्षक, वयोवृद्ध महिला वर्ग पुरुष मंडळी, शालेय विद्यार्थी, युवा वर्ग, परिसरातील गावकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता अल्पोपहार ने झाली.

 कार्यक्रम यशस्वीतेसाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे संपूर्ण पदाधिकारी, सदस्य, शौर्य क्रिडा मंडळ,बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट चंदनखेडा,विरांगना मुक्ताई क्रिडा मंडळ चरुर (धा), गावकरी वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर हनवते यांनी केले तर सुत्रसंचालन अविनाश रणदिवे यांनी केले तर आभार गणेश हनवते यांनी मानले.