परसोडा येथे पहिल्यांदाच तानापोळा साजरा Tanapola is celebrated for the first time at Persoda

113

✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि.16 सप्टेंबर) :- वरोरा तालुक्यातील परसोडा येथे पहिल्यांदाच तानापोळ्याच आयोजन हे शारदा फाउंडेशन चे प्रतिनिधी तथा सामाजिक कार्यकर्ता, शुभम शिवशंकर आमने आणि त्याच्या सोबत त्यांचे सहकारी रंगनाथ कळस्कर, नितेश गारघाटे,प्रदीप कळस्कर,प्रशांत गारगाटे, मंगेश वाटेकर, राहुल गारघाटे, तनय कळस्कर, यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.

परसोडा बॉईज च्या वतीने बक्षीस जाहीर करून गावातील लहान मुलांना उत्साह, आनंदाच, खेडीमुळेच वातावरण निर्माण होण्यासाठी म्हणून गावातील युवकांनी एकत्र येऊन नियोजन केले. बक्षीस हे प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पाचवे असे असून या पोळ्या मध्ये सहभागी सर्व मुलांना बिस्कीट, पेन, बुक भेट दिले. पोळ्यात पहिले वर्ष असून वीस मुलांनी सहभाग दर्शवीला होता.

पहिले वर्ष असल्याने गावातील लोकांचा मोठया प्रमाणात सहभाग दिसून आला शुभम आमने यांनी आपल्या भाषणात येणाऱ्या पुढच्या वर्षात याच पोळ्याच् मोठया प्रमाणात नियोजन करून साजरा करू असे अश्वासन दिले.आणि या सर्व मुलांचा प्रतिसाद बघून आणि गावाकऱ्यांचे सहकार्य बघून मन भरून आलं असं त्यावेळी त्यांनी सांगितलं.