शेतकऱ्यांना पीककर्जाप्रमाणे एकरी व सानुग्रह अनुदान अशी सरसकट ५० हजार रु. मदत तात्काळ द्यावी : रविंद्र शिंदे

▫️मोजक व करपा रोगांचा पिकांवर होतोय प्रादुर्भाव; सोयाबीन पिवळे पडून वाळू लागले

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती (दि .19 सप्टेंबर) :- जिल्ह्यात अनेक दिवसांपासून पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक वाळायला लागले आहेत. याशिवाय या पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भावही होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पीक रोगांच्या प्रादुर्भावामुळे संपल्यात जमा आहे. आणि हा रोग झपाट्याने पसरत असल्याने इतर शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.  यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे जोमात आलेले सोयाबीन पीक नुकत्याच आलेल्या अनोळखी रोगाला बळी पडले आहे. या रोगामुळे झाडे पिवळी पडून संपूर्ण झाड वाळत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक जात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

माहिती घेतली असता असे कळते की येलो मोजक व करपा नावाचा रोग मोठ्या प्रमाणात पिकांवर पसरत आहे. सोयाबीनचे पीक यामुळे पूर्णपणे नष्ट होत असल्याचे दिसून येत आहे. पांढरी माशीच्या प्रभावामुळे येलो मोजक व करपा रोग वाढत आहे. बुरशीजन्य रोग आणि पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडून सुकून जात आहे. त्यामुळे शेतकरी या रोगामुळे आणि पावसाने दडी मारल्याने चिंताग्रस्त झाला आहे.

या समस्येवर तात्काळ उपाययोजना करावी, याकरीता शेतीचे पंचनामे करून पिकाचे झालेले नुकसान पिकविम्यात समाविष्ट करा. शेतकऱ्यांना पीककर्जाप्रमाणे एकरी व सानुग्रह अनुदान अशी सरसकट ५० हजार रु. मदत तात्काळ द्यावी, अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा भद्रावती विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांनी केलेली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील विशेषत: वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील शेतकरी बांधवांना सोयाबीन वरील येलो मोजक आणि करपा रोगांनी सोयाबीन पूर्णतः भुईसपाट केलें आहे. एका दिवशी संपूर्ण शेत पीक नष्ट होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचे पूर्ण नुकसान झाले असुन दिवसेनदिवस हा रोग झपाट्याने शेती नुकसान करीत आहे.

आधीच शेतकरी हा हवालदिल झाला असुन अनेक प्रश्नाला तोंड द्याव लागते. एक तर पिक विम्यापासुन शेतकरी  बाधंवाना यांचा लाभ मिळत नाही. शेती शिवाय त्यांना पर्याय नसुन दुसरा जोडधंदा नाही. दरवषी अनेक  सकंटाना सामोरे जावे लागते. निव्वड सरकारचे मंत्री व लोकप्रतिनिधी शेतीच्या धुऱ्यावर जावुन सांत्वन करतात. परंतु कोणतेच प्रकरण आज पर्यंत निकाली लागले नाही.

पावसाळ्यात वेकोलीच्या चुकीच्या पध्दतीने ढिगारे निर्माण केल्याने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली जाते. तर कधी अतीवरुष्टीमुळे शेतकरी बाधंवाना नुकसानीस समोरे जावे लागते. शासन व प्रशासन स्तरावर  जे काही निर्णय घेतल्या जाते किंवा एखादी योजना अंमलात आणल्या जाते ती योजना परिपूर्ण विकसीत झाले नसते त्यात अनेक त्रुटी असतात त्याचे ताजे उदाहरण म्हणजे पिकविमा योजना यात सुध्दा त्रुटी आहे. 

याबाबत माननीय जिल्हाअधिकारी साहेब आपण या जिल्हयाचे खरे पालनकर्ता  असुन आता शेतकरी बाधंवाची आपल्यावर भिस्त आहे, असे रविंद्र शिंदे म्हणाले.

त्यामुळे या गंभीर विषयी कृषी, महसुल व सबंधीत विभागाव्दारे आपण तात्काळ पाऊले उचलून शेतकरी बाधंवाना नुकसान भरपाई द्यावी. ही नुकसान भरपाई देत असताना बॅंकामार्फत शेतकरी बाधंवाना पिकानुसार पिक कर्ज दिल्या जाते.

सोयाबीन असेल तर एकरी २७००० रुपये दिल्या जाते. हे संपूर्ण शेतकरी आपल्या शेतीसाठी  मध्ये खर्च करतो व पिकनिहाय पिक कर्ज देण्याची रक्कम सुध्दा शासनाचे प्रतिनिधी ठरविते. त्यात कृषी अधिकारी सुध्दा असते. त्यामुळे वरोरा-भद्रावती विधानसभेत व चंद्रपुर जिल्हयात अनेक शेतकर्याचे नुकसान झाले .

त्यांना तात्काळ एकरी पिक कर्ज वाटपाप्रमाने मदत देवुन सोबतच सानुग्रह अनुदान असे मिळुन तात्काळ एकरी 50000 रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी वरोरा-भद्रावती विधानसभाप्रमुख रविंद्र शिंदे, उपजिल्हाप्रमुख तथा भद्रावती कृषी उत्त्पन्न बाजार समिती सभापती भास्कर ताजने.

वरोरा तालुकाप्रमुख तथा वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दत्ता बोरेकर, भद्रावती तालुका प्रमुख तथा न. प. भद्रावती नगरसेवक नरेंद्र पढाल तसेच पिडीत शेतकरी बांधव वरोरा-भद्रावती तालुका यांचे व्दारे प्रसिध्दी पत्रंकाव्दारे मागणी करण्यात येत आहे.