किशोरदादा टोंगे यांनी केला कामगारांसोबत वाढदिवस साजरा Kishoredada Tonge celebrated his birthday with the workers

70

✒️ वरोरा (Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

वरोरा (दि .9 सप्टेंबर) :-

        वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे उच्चशिक्षित युवा नेतृत्व किशोर टोंगे यांनी आपला वाढदिवस वरोरा येथील कामगार चौकात कामगारांसोबत केक कापून आणि कामगारांना टी-शर्ट व फळ वाटप करून साजरा केला. यावेळी मोठ्या प्रमाणात कामगार त्या ठिकाणी उपस्थित होते.

कामगारांना कोणतीही पूर्ण कल्पना न देता कामगार चौकात स्वतः उपस्थित राहून असंघटित कामगारांसोबत वाढदिवस साजरा केल्याने कामगारांमध्ये आनंदाच उत्साहाचं वातावरण होत. 

एखाद्या सामाजिक राजकीय नेत्याचा असा आगळा वेगळा नावीन्यपूर्ण वाढदिवस आम्ही कामगार पहिल्यांदाच वरोरा शहरात पाहत आहोत अशा भावना अनेकांनी त्याठिकाणी बोलून दाखवल्या. तसेच आपल्याला वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हा गरीब कामगार बांधवांची जाणीव ठेवली असं मत यावेळी कामगारांनी सांगितल आणि किशोर टोंगे यांचे आभार देखील व्यक्त केले.

माझं काम हे समाजातील शोषित वंचित घटकातील मजूर, शेतमजूर, स्त्रिया, अनाथ अपंग आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी असल्याचे त्यांच्या आयुष्यात प्रकाश पाडण्यासाठी काम करत राहणार असल्याच्या भावना किशोर टोंगे यांनी व्यक्त केल्या.