अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार Leopard killed in collision with unknown vehicle

▫️नागभीड-नागपुर महामार्गावरील कानपा गावा जवळील घटना(Incident near Kanpa village on Nagbhid-Nagpur highway)

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.20 ऑगस्ट) :- नागभीड-नागपुर या महामार्गावरील कानपा गावा जवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार झाल्याची घटना रविवारला रात्रौ आठ वाजताच्या दरम्यान घडली. हा बिबट जागीच मृत पावला आहे.या मार्गावर कानपा,बिकली गावाला लागून जंगल आहे.

येथे वन्यप्राण्यांचा वावर आहे ते नेहमीच रोडवर येत असतात रविवारला बिबट हा रस्ता ओलांडताना त्याला एका अज्ञात वाहने धडक दिली.या घटनेची माहिती नागभीड वनविभागाला देण्यात आली लगेच वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले .