ट्रक -कारचा भीषण अपघात A terrible truck-car accident

107

▫️नागभीड-ब्रम्हपुरी रोडवरील मेंढा गावा जवळील घटना(Incident near Mendha village on Nagbhid-Brahmpuri road)

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.21 ऑगस्ट) :- नागभीड -ब्रम्हपुरी या राष्ट्रीय महामार्गावर मेंढा (किरमिटी) गाव जवळ रविवारला अडीच वाजताच्या सुमारास ट्रक व कार धडकेत कार मधील दोन व्यक्ती जख्मी झाल्याची घटना घडली.

नागपुर वरुन ब्रम्हपुरी कडे ट्रक क्रमांक एम.एच ४०बि.एल.३६७० जात होता .तर ब्रम्हपुरी कडुन नागपूर कडे  कार क्रमांक एम.एच ४९ बी.बी १४६६ ही जात होती. या मार्गावरील मेंढा गावा जवळ या दोघांची आमोरा सामोर धडक झाली.त्यात कार मधील दोन व्यक्ती जख्मी झाले आहेत.

किसन महादेव ठाकरे (६२)साकार किसन ठाकरे (२६) अशी जख्मीचे नावे आहेत. यांना उपचारासाठी ब्रम्हपुरी येथे खाजगी दवाखान्यात हलविले आहे. पुढील तपास नागभीड पोलिस करीत आहे.