पुरामुळे कोकेवाडा तू. येथे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान  Many farmers lost in Kokewada (Tu) due to flood

▫️नुकसान भरपाई द्या युवा कार्यकर्ते श्री प्रतीक अभय खिरटकर यांची मागणी(Demand of youth activist Mr. Prateek Abhay Khirtkar)

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.20 ऑगस्ट) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या चारगाव धरणाला काल शनिवार च्या रात्रौ झालेल्या मुसळधार पावसामुळे महापूर आला असल्याने या पुराच्या पाण्यामुळे हजारो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली आली असून शेत पिकाचे फार मोठे नुकसान झाले आहे . तर या पुराचा फटका सर्वाधिक कोकेवाडा तूकुम या गावाला पडला असून येथील युवा शेतकरी श्री प्रतीक अभय खिरटकर यांची शेती नदी लगत असल्याने यात 2 एकर मधे धान .

5 एकर मध्ये सोयाबीन , 3 एकर मध्ये कापूस असून सर्वत्र शेतामध्ये पाणी साचलेले आहे हे सर्व पिके पाण्याखाली असल्याने ते नष्ट होण्याच्या मार्गात लागले आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून ते व्यर्थ जात असल्याने येणाऱ्या समोरील दिवसात उपासमारीची वेळ नाकारता येत नाही किंवा आत्महत्या शिवाय पर्याय राहणार नाही करिता अश्या गंभीर समस्या कडे तात्काळ लक्ष देऊन .पीडित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

          शिवाय या सोबत येथील चेतन रमेश खिरटकर , मंगेश खाडे , प्रकाश भरडे , सुभाष ठावरी , प्रवीण चिकटे,यांच्या सह अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.तेव्हा मान. तहसीलदार साहेब यांनी तात्काळ या विभागाची प्रत्यक्ष पाहणी करून सर्व शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी युवा कार्यकर्ते प्रतीक अभय खिरटकर यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केली आहे.