ग्रामपंचायत निष्काळजीपणामुळे शेगाव बाजारपेठ बनले समस्येचे माहेरघर  Due to Gram Panchayat negligence, Shegaon Market became the epicenter of the problem

🔸दरवर्षी येतो ग्रामपंचायतला लाखो निधी(Lakhs of funds come to Gram Panchayat every year)

🔹पावसाळ्यामध्ये दुकानदार सहित जनतेला होनार त्रास(During the monsoons, people including shopkeepers face problems)

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू(Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.22 जून) :- तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून शेगाव ची ओळख आहे, शेगाव ची लोकसंख्या दहा हजार च्या वर असून या ठिकाणी सोमवारला मोठा बाजार भरत असून या ठिकाणी जवळपासचे 70 ते 80 गावातील नागरिक, तसेच परिसरातील दुकानदार बाजारामध्ये येत असतात परंतु या ठिकाणी नागरिकांना व दुकानदारांना जाण्यासाठी, येण्यासाठी रस्ताच बरोबर नसल्यामुळे मोठा त्रास सहन लागत आहे…

शेगावमध्ये बाजाराच्या पटांगणामध्ये ठीक ठिकाणी मोठमोठे बोर्डर गिट्ठी मागील अनेक दिवसापासून ग्रामपंचायत कडून बाजार पटांगणाच्या ठिकाणी टाकण्यात आले आहे, परंतु त्याची रोलिंग न करता तसेच टाकण्यात आले, त्या ठिकाणी नेहमी जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना बाजाराच्या दिवशी तसेच इतर दिवशी परिसरातील नागरिक महिला, पुरुष, शालेय विद्यार्थी,विद्यार्थिनी, आई-वडिलांसोबत येणारे लहान मुले बाजाराला येत असताना बाजारातील पटांगणात चालताना मोठा त्रास ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे दुकानदार तसेच नागरिकांना चालताना त्रास सहन कराव लागत आहे,

ग्रामपंचायत च्या बांधकाम करण्यात आलेल्या चाळीमध्ये रस्ता असून त्या ठिकाणी सलाके निघून असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे..

पावसाळ्याच्या दिवसाला सुरुवात झाली असुन परिसरातील शेतकरी या ठिकाणी बी बियाणे, खते,औषधी, शेतीसाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी येत असतात तसेच काही दिवसांमध्ये शाळेला सुद्धा सुरुवात होत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक मुलांना शालेय पुस्तकं, कपडे, इतर वस्तू घेण्यासाठी बाजारामध्ये येत असतात तसेच दुकानदारांना आपली बाजार दुकान सजवताना मोठा त्रास होत असून पावसाळ्यात दिवसांमध्ये सगळीकडे चिखल,गंदगी पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे..

सोमवारला बाजारपेठेत विविध प्रकारचे दुकाने सजवलेली जात असल्याने यामध्ये किराणा दुकान, कपड्याची दुकान, पुस्तके दुकान ,नाश्ता, फ्रुट ,दुकाने भाजीपाला, फळे इतर दुकाने असून याठिकाणी मच्छी मार्केट मटन मार्केट मोठ्या प्रमाणात आहे, ग्रामपंचायत दरवर्षी बाजाराचा लाखो रुपयाचे लिलाव करून ग्रामपंचायत ठेका संबंधीत ठेकेदाराला दिल्या जाते परंतु याकडे ठेकेदारांनी दुकानदारला बाजारपेठे कोणत्याही प्रकारचे सुविधा दिल्या नसून फक्त वसुलीच्या मार्गे ग्रामपंचायत, ठेकेदार लागलेले आहे….

ग्रामपंचायतला सामान्य निधी व्यतिरिक्त केंद्र सरकार, राज्य सरकार, तसेच जिल्हा परिषद यांच्याकडून वेगवेगळ्या निधी येत असून जनतेच्या सुविधेसाठी खर्च करणे अनिवार्य असते.त्यामुळे बाजारपेठेच्या पटांगणामध्ये ग्रामपंचायतने जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्यावर मुरूम टाकून मार्ग बनवून देण्याची मागणी परिसरातील जनतेसहित, दुकानदारांकडून करण्यात येत आहे….