माजी सैनिक व विरपत्नी यांचा शिवसेना ( उ. बा. ठा. ) पक्ष प्रवेश Ex-servicemen and widows join Shiv Sena (U. Ba. Tha.) party

▫️स्वातंत्र्य दिनी  वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रात ऐतिहासिक क्षणाची नोंद(Record of historical moment in Warora-Bhadravati Assembly Constituency on Independence Day)

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती (दि.16 ऑगस्ट) :- दि. १५ ऑगस्ट रोज मंगळवार ला स्वातंत्र्यदिनी माजी सैनिक व विरपत्नी यांनी शिवबंधन बांधीत शिवसेनेच्या ‘ शिवालय ’ ह्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना ( उ. बा. ठा. ) पक्षात  प्रवेश केला. स्वातंत्र्यदिनाच्या शुभ पर्वावर  संपूर्ण महाराष्ट्रात  या ऐतिहासिक क्षणाची नोंद वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रात झाली.

    याप्रसंगी देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शुर विरांच्या विर पत्नी आणि माजी सैनिक यांना अत्यंत सन्मानपूर्वक शिवबंधन बांधीत त्यांचा पक्ष प्रवेश सभारंभ पार पडला. याप्रसंगी पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना ( उ. बा. ठा. ) वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांच्यासह  शिवसेना जिल्हा महिला संघटिका तथा राणी लक्ष्मीबाई महिला रक्षणदल जिल्हाप्रमुख नर्मदा बोरेकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुषमा शिंदे, युवा सेनापुर्व विदर्भ सचिव प्रा. निलेश  बेलखेडे, उपजिल्हाप्रमुख भास्कर ताजने, भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर व वरोरा शहर प्रमुख वर्षा कुरेकर प्रामुख्याने हजर होत्या.

   या ऐतिहासिक क्षणी कारगील योद्धा तथा जयहिंद फाऊंडेशनचे सल्लागार कॅप्टन विलास देठे, जेष्ठ माजी सैनिक तथा तीन युध्दात सक्रीय सहभाग घेतलेले रामचंद्र नवराते, जयहिंद फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष तथा माजी उपसरपंच विजल तेलरांधे, माजी सैनिक  कारगील योध्दा रुपेश कुत्तरमारे,माजी सैनिक अरुण खापने, माजी सैनिक नामदेव मांडवकर, माजी सैनिक कारगील योध्दा अजीत राम, माजी सैनिक प्रमोद गावंडे, माजी सैनिक संजय बेलेकर, माजी सैनिक अरुण मत्ते, माजी सैनिक कारगील योध्दा सुरेश नाकाडे, माजी सैनिक रमेश सातेकर, माजी सैनिक मारोती जांभुळे, माजी सैनिक दिलीप गंग्रस, माजी सैनिक बीएसएफ अनिल जिवतोडे, माजी सैनिक कारगील योध्दा राकेश फूले, माजी सैनिक नमोद रामटेके, माजी सैनिक कारगील योध्दा भाऊराव मत्ते आणि  माजी सैनिक  श्रीराम कुलकर्णी यांच्यासह माजी सैनिक पत्नी द्वारका नवराते, विरपत्नी सुर्या विश्वास सावसाकडे, विरपत्नी रंजना प्रकाश घटे, विरपत्नी कमल सुरेश मत्ते ,विरपत्नी विजया अब्रहम सम्युअल, माजी सैनिक पत्नी मनिषा राकेश फूले, माजी सैनिक कन्या पुजा तिरमलवार आणि जयहिंद फाऊंडेशनच्या सहसचिव दर्शना तेलरांधे यांनी शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षात प्रवेश केला.

      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना जिल्हा महिला संघटिका तथा राणी लक्ष्मीबाई महिला रक्षणदल जिल्हाप्रमुख नर्मदा बोरेकर यांनी केले. याप्रसंगी युवा सेनापुर्व विदर्भ सचिव प्रा. निलेश बेलखेडे आणि वरोरा शहर प्रमुख वर्षा कुरेकर यांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भद्रावती तालुका प्रमुख नरेंद्र पढाल व आभार प्रदर्शन भद्रावती  शहर घनश्याम आस्वले यांनी केले. या कार्यक्रमात खेमराज कुरेकर, ज्ञानेश्वर डूकरे, प्रशांत कारेकर, अरुण घुगल, प्रिती पोहाणे, सरला मालेकर, भावना खोब्रागडे यांच्यासह फार मोठया संख्येत शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्ते बंधू -भगिनी सहभागी झाले. कोरोना योध्दा पंकज कातोरे यांचा वाढदिवस या निमित्याने साजरा करण्यात आला.

रविंद्र शिंदे यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरीत होऊन पक्षप्रवेशाचा निर्णय…कॅप्टन देठे :- या प्रसंगी कारगील योद्धा तथा जयहिंद फाऊंडेशनचे सल्लागार कॅप्टन विलास देठे म्हणाले की,शिवसेना (उ.बा.ठा.) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे यांनी कोरोना संक्रमण कालावधीत केलेले सामाजिक कार्य तसेच त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून सुरु असलेले विविध समाजपयोगी उपक्रम यापासून प्रेरणा घेऊन आम्ही त्यांच्या सोबत  समाजाकरीता काम करण्यासाठी शिवसेना ( उ. बा. ठा. ) पक्षात प्रवेश

सैन्य दलातील अनूभवाचा लाभ समाजाला करून देणार…विजय तेलरांधे :- जयहिंद फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष  विजय तेलरांधे याप्रसंगी म्हणाले की, आम्हाला सैन्यदलातील मिळालेला अनुभव समाजातील तरुण पिढीला व्हावा. त्यांच्यात देश सेवा, स्वयंशिस्त, उत्तम आरोग्य आणि निर्व्यसनीपणा रुजविण्यासाठी शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यासाठी आम्ही पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतला आहे. सोबतच माजी सैनिक आणि विर पत्नी यांच्या परिवारीक अडीअडचणी, समस्या व मागण्या शासन व प्रशासन दरबारी रेटून त्यांना मार्गी लावण्यासाठी आम्ही हा सामुहिक निर्णय घेतल्याचे विजय तेलरांधे यांनी या प्रसंगी सांगितले.

माजी सैनिक व विरपत्नी यांना पक्षात योग्य सन्मान मिळेल…रविंद्र शिंदे :- पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात देशासाठी अविरत कार्य केलेल्या माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबातील विरपत्नी यांना पक्षात योग्य सन्मान मिळेल . आता ही सर्व मंडळी शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचे घटक झाले आहे.त्यांच्या अनुभावाचा पक्षाला निश्चीतच लाभ होईल. त्यांच्या समस्या, मागण्या व अडचणी मार्गी लावून त्यांना योग्य न्याय मिळविण्यासाठी आम्ही सदैव प्रामाणिक प्रयत्न करू.

अवघ्या महाराष्ट्रात वरोरा -भद्रावती विधानसभा  क्षेत्रात मोठ्या संख्येत माजी सैनिक व विरपत्नी यांचा शिवसेना (उ.बा.ठा.) मधील पक्ष प्रवेश निश्चीतच शिवसेना परीवारासाठी भूषणावह आहे. असे प्रतिपादन शिवसेना (उ.बा.ठा.) वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र प्रमुख रविंद्र शिंदे यांनी या प्रसंगी केले.