????वरोरा वनविभागाची कारवाई
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.16 ऑगस्ट) :- 15 आगस्त रात्रौ 09.00 वाजताचे दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा व वनकर्मचारी गस्त करीता असतांना गस्ती दरम्यान मौजा उखर्डा सर्व्हे क्र.28 झुडपी जंगलामध्ये नामे विनोद किसन राऊत वय 31 वर्षे व विनोद विनायक पवार वय 30 वर्षे दोन्ही रा उमरविहीर पो.मुसाळा, ता.राळेगाव, जि.यवतमाळ हे संशयास्पद स्थितीत आढळून आले.
त्यांची चौकशी केली असता त्यांचे कडून एक जिवंत ससा(मादी) बजाज CT-100 मोटरसायकल व वन्यप्राण्याचे शिकारी करीता लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.
त्याचेवर प्रा.अ.सु.क्र.09180/229480 दिनांक 15/08/2023 भारतीय वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम 1972 चे कलम 9,51 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
पुढील चौकशी मा.प्रशांत खाडे विभागीय वनअधिकारी चंद्रपूर व मा. आदेशकुमार शेंडगे सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू)चंद्रपूर वनविभाग, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात सतिश किसन शेंडे,वनपरिक्षेत्र अधिकारी,वरोरा, दिवाकर चांभारे, टेमुर्डा, जितेंद्र लोणकर शेगाव, संजय खोब्रागडे वरोरा, गौरव केजकर वनरक्षक, संतोष वेदांती वनरक्षक, अमोल तिखट वनरक्षक व अमोल नेवारे वनरक्षक आजनगाव करीत आहे.
