बल्लारपूर शहरातील येणारे शिवाजी वार्ड चे नामांतर करून आदरपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज वार्ड करा..संभाजी ब्रिगेडची मागणी Rename the coming Shivaji Ward in Ballarpur city to Chhatrapati Shivaji Maharaj Ward with respect.. Demand of Sambhaji Brigade

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.11 ऑगस्ट) :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराज (shri.Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल जनसामान्य लोकांमध्ये आदर व सन्मान आहे.

हीच बाब लक्षात घेऊन, बल्लारपूर शहरातील प्रभाग क्र.१२ अंतर्गत येणारे शिवाजी वार्ड (shiwaji ward)चे नामांतर आदरपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज वार्ड(Chhatrapati Shivaji Maharaj Ward)करण्यात यावे.

व यासाठी स्थानिक पातळीवर ठराव मंजूर करावे, याकरीता संभाजी ब्रिगेड बल्लारपूर तर्फे मान. मुख्याधिकारी साहेब, नगर परिषद बल्लारपूर यांना आज दिनांक ११/०८/२०२३ रोजी निवेदन देण्यात आले. या वेळी साहिल घिवे, संकेत चौधरी, निखिल वडस्कर, निलेश सुर, अनिकेत गजभिये, शुभम मानकर उपस्थित होते.