✒️ परमानंद तिराणिक वरोरा (Warora प्रतिनिधी)
वरोरा (दि.3 मार्च) :-आनंद अंध विद्यालय, आनंदवनाच्या अंध विद्यार्थ्यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे व क्रिडा संचालनालय महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या दिव्यांग मुला – मुलींच्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धामध्ये छकुली राठोड हिने १०० मीटर धावने या क्रिडा प्रकारात राज्यातुन प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक जिंकले तर राकेश पोदाळी याने बुध्दीबळ या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून एक सुवर्ण पदक व गोळाफेक या स्पर्धेत तिसरा क्रमांक प्राप्त करीत कास्यं पदकांचा मानकरी ठरला.
अंतरा पिपरे या विद्यार्थ्यीनीनें लांब उडी या स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त करून एक रोप्य पदक व ५० मीटर धावणे या स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवित कास्यं पदक पटकाविले. आस्था जगताप या पुर्णत : अंध असलेल्या विद्यार्थ्यीनीनें २५ मीटर धावणे स्पर्धामध्ये तिसरा क्रमांक प्राप्त करीत ती सुध्दा कास्यं पदकांची मानकरी ठरली आहे.
आनंद अंध विद्यालय, आनंदवनाच्या विद्यार्थ्यांनी राज्य स्तरावर दिव्यांग स्पर्धांच्या अंध प्रवर्गातून घवघवीत यश मिळविल्याबद्दल महारोगी सेवा समितीचे सचिव मा. श्री. डाँ. विकास भाऊ आमटे , जेष्ठ समाजसेवक यांच्यासह, डाँ. भारती आमटे, कौस्तुभदादा आमटे, पल्लवीताई आमटे, डाँ. विजय पोळ, संस्थेचे विश्वस्त श्री. सुधाकर कडू, अंध शाळेचे मुख्याध्यापक सेवकराम बांगडकर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या यशस्वी कामगिरी बद्दल अभिनंदन केले आहे.
या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी शालेय क्रीडा विभाग प्रमुख साधना ठक, तनुजा सव्वाशेरे, विलास कावणपुरे, कलाशिक्षक परमानंद तिराणिक, कृष्णा डोंगरवार, राकेश आत्राम, वर्षा उईके, लिला कोंद, जितेंद्र चूदरी या शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांचे विद्यार्थ्यांच्या यशात मोलाचा वाटा आहे
