चंद्रपूर मनपात महाराष्ट्र दिन साजरा Chandrapur Municipality celebrates Maharashtra Day

✒️उमेश तपासे चंद्रपूर (Chandrapur प्रतिनिधी)

चंद्रपूर( दि.3 मे ) :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सोमवार (ता. १) चंद्रपूर महानगरपालिका मुख्यालयात मनपा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

    याप्रसंगी राष्ट्रगीत तसेच महाराष्ट्राचे राज्यगीताचे सामुहिक गायन करण्यात आले तसेच अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन असा संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात येऊन महाराष्ट्राची गौरव गिते वाजविण्यात आली. आयुक्त विपीन पालीवाल यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शहरातील विकास कामांचा आढावा घेतला व विधायक कामांना वेग देण्याचे निर्देश दिले.

     याप्रसंगी मनपाचे उपायुक्त अशोक गराटे, शहर अभियंता महेश बारई,सहायक आयुक्त विद्या पाटील, उपअभियंता विजय बोरीकर,अनिल घुमडे यांच्यासह सर्व कर्मचारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्य संपादक :- मनोज गाठले

संपर्क : 9767883091