चारगाव बू. येथे श्री संत भोजाजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

375

✒️शेगाव बू (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

 शेगांव बू (दि.1 फेब्रुवारी) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या चारगाव बू येथे आज जया एकादशी चे औचित्य साधुन श्री संत सद्गुरू भोजाजी महराज तथा या एक महिन्यापूर्वी श्री संत सद्गुरू जगनाडे महाराज यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना स्वर्गवासी फागोराव हिवरे , स्व. लक्ष्मीबाई हिवरे , बाजीराव हिवरे , मांजुळाबई , नामदेव हिवरे , सौ सीमाताई हिवरे यांच्या स्मुर्ती प्रीत्यर्थ चारगाव बु. येथील जागृत देवस्थान तथा चारगाव चे आराध्य दैवत श्री संत नानाजी महाराज यांच्या मंदिरात श्री संत भोजाजी महाराज व श्री जगनाडे महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.. 

            या निमित्याने गावात ग्रामसफाई , स्वच्छ्ता मोहीम, गाव रस्त्यावर सुशोभित रस्ते , रांगोळी काढण्यात आली . याच निमित्याने भोजाजी महाराज यांच्या प्रतिमांची शोभा यात्रा काढण्यात आली. भजन दिंडीने गावात अधिक शोभा आली .

     श्री अभिजीत हिवरे व सौ दामिनी अभिजीत हिवरे यांच्या हस्ते हिंदू विधिवत पूजन , होम हवन करून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली… 

        सदर ही मूर्ती श्री संभाजी हिवरे , देविदास हिवरे ,यांच्या सहकार्यातून या मूर्ती चारगाव वासियांना मंदिरात दान प्रदान करण्यात आल्या.. याचे आभार म्हणून श्री लक्ष्मी नारायण देवस्थान चारगाव चे पदाधिकारी श्री मधुकर भलमे , अविनाश डाहुले , विठ्ठल तुरानकर यांच्या हस्ते गावकऱ्या समोर त्यांचे तसेच हिवरे परिवाराचे पुषपगुच्छ देऊन त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला. 

          याच कार्यक्रमाचे ओचित्या साधून श्री गाडगे महाराज यांच्या काल्याचे किर्तन प्रवचन सदर करण्यात आले याला साद सांगत म्हणून गुरुदेव भजन मंडळ यांची सहकार्य दर्शवले व संपूर्ण गवकर्यासाठी भव्य भोजनदान. महाप्रसाद चे आयोजन देखील करण्यात आले होते . या कार्यक्रमासाठी तिरुपती हिवरे , राजकुमार हिवरे , प्रमोद हिवरे , विकास हिवरे , निखिल हिवरे , संदीप हिवरे , इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले. 

       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विठ्ठल तुरणकर यांनी केले तर आभार अविनाश डाहुले , मधुकर भलमे , तंटा मुक्त समिती चे अध्यक्ष छगन आडकिने , महादेव भोयर , डा. चांभारे , तथा गुरुदेव सेवा मंडळ तसेच गावकऱ्यांनी अधिक श्रमदान सहकार्य केले….