वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेना तर्फे महिला आघाडी स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन

🔹शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचे वरोरा-भद्रावती विधानसभा महिला आघाडीच्या वतीने क्षेत्रात उपक्रम

 ✒️मनोज कसारे (वाघेडा प्रतिनिधी)

 वाघेडा (दि.16 जानेवारी) :- हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती तसेच मकर संक्रांतीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे व पूर्व विदर्भ महिला संघटीका व प्रवक्ता प्रा. शिल्पा बोडखे यांचा मार्गदर्शनात सौ नर्मदा बोरेकर चंद्रपूर जिल्हा प्रमुख महिला आघाडी शिवसेना यांच्या विद्यमाने महिला_आघाडी_स्नेहमिलन_सोहळ्याचे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात आयोजन करण्यात आले. दि. १६ पासून माढळी, नागरी, घोडपेठ, वरोरा, शेगाव (बु), भद्रावती, कोंढा, बोर्डा, मांजरी, खांबाळा, टेमुरडा, चोरा इथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

महिला आघाडी स्नेहमिलन सोहळ्याचे दि. १६ पासून वरोरा तालुक्यातील माढळी येथून सुरवात करण्यात आली. सर्व उपस्थित महिलांना मकरसंक्रांती निमित्त वाणचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख नर्मदा बोरेकर तर उदघाटक म्हणून सुषमाताई शिंदे लाभले. कार्यक्रमात मंचावर शिवसेना वरोरा तालुकाप्रमुख दत्ता बोरेकर, जेष्ठ शिवसैनिक बळीराम चवले, जयाताई हुलके उप-सरपंच माढळी हे उपस्थित होते.

सोबतच वरोरा उप-तालुका प्रमुख अरुण महल्ले, मायाताई नारळे उप-जिल्हा प्रमुख महिला आघाडी भद्रावती, भद्रावती महिला शहर प्रमुख शीला आगलावे, माढळी ग्राम पंचायत सदस्य महेश देवतळे, नीलिमा दरवडे, वर्षा महाजन, भडगरे व गोपाळ देवतळे जेष्ठ शिवसैनिक, वरोरा महिला तालुका संघटक मुरस्कर मॅडम, तालुका महिला समन्वयक सरळ मालोकर सुद्धा मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाचं संचालन महाडोळी येथील सरपंच प्रतिभा मांडवकर तर प्रास्ताविक सरला मालोकर यांनी केले सोबतच माला ढेंगळे यांनी स्वागत गीत गायले व आभारप्रदर्शन पुष्पा उईके यांनी केले.