महाराष्ट्र राज्य महिला फीडे रेटिंग बुद्धिबळ चॅम्पियन 2023 श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर येथे उद्घाटन सोहळा संपन्न Maharashtra State Women FEED Rating Chess Champion 2023 Shramik Jakarta Sangh Inauguration Ceremony Concluded at Chandrapur

🔹अपयशातून यशाचे उंच शिखर गाठता येतो- मा.डॉ. हेमचंद कन्नाके, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी,चंद्रपूर(A high peak of success can be reached through failure – Hon.Dr. Hemchand Kannake, District Resident Medical Officer, Chandrapur)

✒️चंद्रपूर (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.17 जून) :- क्रियेटीव्ह चेस असोसिएशन चंद्रपूर व श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र राज्य महिला फीडे रेटिंग बुद्धिबळ चॅम्पियन चंद्रपूर येथे दिनांक 16 जून ते 18 जून 2023 असे तीन दिवसीय स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 16 जून रोज शुक्रवार ला मोठ्या थाटात संपन्न झाले. स्पर्धेत स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. महाराष्ट्रतील एकूण 44 महिला स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धक मधे जिल्हा मधून निवड झालेले स्पर्धक तर काही डोनर एन्ट्री करून आलेले स्पर्धक आहेत.

      ही स्पर्धा निवड स्पर्धा आहे. स्पर्धा मधून एकूण 7 स्पर्धकाची गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा करीता निवड करण्यात येणार. स्पर्धा मधे एकूण 72 हजार रुपयाचे पुरस्कार रक्कम ठेवलेली असून 10 स्पर्धकांना ही रक्कम वाटण्यात येणार आहे. त्याच बरोबर त्यांना सन्मान चिन्ह सुद्घा प्रदान करण्यात येणार आहे.

     स्पर्धेचे उद्घाटक मा. डॉ. हेमचंद कन्नाके यांनी सफेद मोहरा चालवून रीतसर उद्घाटन केले. त्याच बरोबर त्यांनी महत्वपूर्ण आरोग्य व खेळ या बद्दलचे महत्व पटवून दिले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. रंजीत डवरे सर यांनी अतिशय महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. प्रमुख अतिथी मा. प्रशांत विघ्नेश्वर , उपाध्यक्ष श्रमिक पत्रकार संघ चंद्रपूर यांनी क्रीडाचे महत्व पटवून दिले. स्पर्धेचे मुख्य आरबिटर मा.स्वप्नील बनसोड सर यांनी बुद्धिबळ स्पर्धे बद्दल महत्व पूर्ण माहिती दिली.

स्पर्धेचे आयोजक मा. आश्विन मुसळे सर,मा. नरेन्द्र कन्नाके सर व कुमार कनकम सर तसेच ऑर्बिटर कुमारी गायत्री पाणबुडे यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका सहज पूर्ण केली. सूत्रसंचालन नरेंद्र कन्नाके (सहायक शिक्षक,नेहरू विद्यालय शेगाव बूज .)यांनी केले. अध्यक्ष, उद्घाटक,प्रमुख अतिथी तसेच सर्व महिला खेळाडू,पालक या सर्वांचे आभार मानून उद्घाटन सोहळ्याची सांगता करण्यात आली.