आष्टी परिसरात वाघिणीचा मृत्यू  Death of tigress in Ashti area

103

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.31 जुलै) :- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील आष्टी काकडे गावातील गावशिवरात एका पट्टेदार वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक 31 रोज सोमवारला सकाळी उघडकीस आली.

 सदर वाघीण ही वयस्क असून ती अंदाजे चार ते पाच वर्षाची आहे. विजेच्या स्पर्शाने या वाघिणीचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त होत असला तरी याबाबत अधिकृत माहिती शवाविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मिळेल.सकाळी काही गावकऱ्यांना ही वाघीण मृत्युमुखी पडलेली दिसल्यानंतर याची माहिती वनविभागाला देण्यात आली.

त्यानंतर भद्रावती वनविभागाच्या चमूने घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला व वाघिणीचा मृतदेह चंद्रपूर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या घटनेचा पुढील तपास भद्रावती वनविभाग करीत आहे.हा आठवडा जिल्ह्यातील वाघांसाठी घात वार ठरला असून जिल्ह्यात जवळपास तीन वाघांचा मृत्यू या आठवड्यात झालेला आहे.

https://smitdigitalmedia.com/