विदर्भ स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आनंद निकेतन महाविद्यालयात संपन्न झाली Vidharbha level chess tournament concluded at Anand niketan college

🔸विद्यार्थ्यांच्या शारिरीक विकासाबरोबर बौद्धिक विकास सुद्धा गरजेचा त्याकरिता उन्हाळी शिबिराचे आयोजन- मा. डॉ. मृणाल काळे, प्राचार्य आनंद निकेतन महाविद्यालय

✒️परमानंद तिराणिक वरोरा(Warora प्रतिनिधी)

वरोरा(दि.6मार्च) :- नीरजा समूह महाराष्ट्र राज्य ,आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन व समाजकार्य बहुउद्देशिय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय बुद्धिबळ स्पर्धा दिनांक 5 मार्च 2023 ला घेण्यात आली. स्पर्धेत स्पर्धकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले.

स्पर्धेमध्ये दोन प्रवर्ग होते,पहिला प्रवर्ग १५ वर्षाखालील स्पर्धकांसाठी तर दुसरा प्रवर्ग खुला प्रवर्ग म्हणून होता. प्रत्येक प्रवर्गात प्रत्येकी ५ बक्षिसे ठेवण्यात आलेली होती.खुल्या प्रवर्गात साहिल गोरघाटे हे प्रथम क्रमांक प्राप्त केले. सिद्धांत पिटलवार (द्वितीय), दीपक सहारे (तृतीय), सुधीर म्हात्रे (चतुर्थ), विशाल गोडमारे (पाचवे) या सर्वांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देण्यात आले. अशी खुल्या प्रवर्गातील विजेत्यांची नावे आहेत.

१५ वर्षाखालील स्पर्धकांत सार्थ भुजाडे यांना प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. हेरंब निर्वाण (द्वितीय), सक्षम चडे (तृतीय), संग्राम चव्हाण(चतुर्थ), संस्कार मोरे (पाचवा) अशी १५ वर्षाखालील प्रवर्गातील विजेत्यांची नावे आहे. यांना सुध्दा रोख रक्कम व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले.तसेच 9,11,13 वर्षा खालील एका स्पर्धकांना प्रोत्साहन पर सन्मान चिन्ह देण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.डॉ. मृणाल काळे प्राचर्या,आनंद निकेतन महाविद्यालय म्हणून उपस्थित होते. तसेच क्रीडा प्रमुख श्री. तानाजी बायास्कर , समाजकार्य बहु उद्देशिय संस्था चे अध्यक्ष श्री. गोविंद बोकडे तसेच नीलिमा लोणकर प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन व मुख्य आरबीटर मा. नरेन्द्र कन्नाके यांनी अतिशय महत्वपूर्ण भूमिका सहज पूर्ण केली. अभिजित आष्टकर ,नीरज आत्राम सर, सर्व कोचींगचे विद्यार्थी प्रामुख्याने सहकार्य केले. स्पर्धेला चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, नागपूर,वर्धा येथील खेळाडू सहभागी झाले होते.

बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यास अभिजीत अष्टकर, नरेंद्र कन्नाके (सहायक शिक्षक,नेहरू विद्यालय शेगाव बूज .),तानाजी बायस्कर,(शारीरीक क्रिडा विभागप्रमुख,आनंदवन) यांनी अथकपणे प्रयत्न केले. दीपक ढेंगळे , प्रभाव्य देव्हारे यांनी स्वयमसेवक म्हणून आपली भूमिका निभावली.स्पर्धा यशस्वी झाल्या बद्दल सर्वांनी आयोजकांचे अभिनंदन केलेले आहे.