पुणे येथे मराठीं चित्रपट रंग अबोली या चित्रपटाचे बॅनर व प्रमो लॉंचिंग

✒️स्नेहा उत्तम मडावी पुणे (Pune प्रतिनिधी)

पुणे(दि.11 ऑक्टोबर) :- आज् रोजी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालन पुणे येथे रंग अबोली या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या रहस्यमय मराठी चित्रपटाचे बॅनर व प्रमो लॉन्चिंग निशिकांत महाबळ मालक यांच्या हस्ते आणि चित्रपटाचे निर्माते संजय चौगुले, प्रमुख कलाकार गिरीश परदेशी, दिग्दर्शक नितीन भास्कर यांच्या उपस्थितीत पार पडला. या चित्रपटाचे कलाकार आहेत तेजस्विनी पंडित गिरीश परदेशी अंगत म्हसकर माधव अभ्यंकर शरद पोंक्षे आहेत.

चित्रपटाची निर्मिती . रावसाहेब बंधुरे व संजय चौगुले यांनी केले असून दिग्दर्शन नितीन भास्कर, यांनी केला आहे तर संकलन स्मिता फडके, कॅमेरा समीर भास्कर, आणि कार्यकारी निर्माते दुष्यंत इनामदार आणि प्रवीण वानखेडे हे आहेत. या कार्यक्रमाला लालासाहेब माने आणि चित्रपटाचे डिस्ट्रीब्यूटर टेक्नो क्रिएशन्स चे रोहित जगदाळे पत्रकार स्नेहा उत्तम मडावी अंकरींग श्रुति चव्हान दैनिक लोकांकीत पेपरचे पुणे उप संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले अभिनेता मारुती पोतदार अभिनेता अमोल् भोस्ले अंगत माधव उपस्थित होते. हा चित्रपट लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट खुप काही शिकन्यसारखे आहेअनुभव देणार आहे असा चित्रपट महाराष्ट्रात पाहिल्यांदा पहायला मिळेल आणि सगळ्यांनी थेटर जाऊन पाहवा आभिनेता गिरीश परदेशी यांनी सांगितले थेटरला लवकरच प्रदर्शित होणार आहे व शुभेच्छा दिल्या.