ग्रामगीता महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती साजरी Rashtrasant Tukdoji Maharaj Jayanti Celebration at Gram Gita College

214

✒️योगेश मेश्राम मालेवाडा(चिमूर विशेष प्रतिनिधी)

मालेवाडा (दि.4 मे ) :- चिमूर येथील ग्रामगीता महाविद्यालय येथे दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

प्राचार्य डॉ. अमीर धमानी सर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रसंतांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तुकडोजी महाराज रचित राष्ट्रवंदना गाण्यात आले.

डॉ. अमीर धमानी सर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेले समाजसुधार कार्य आणि जनजागृती या विषयावर उपस्थितीताना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे कर्मचारी, शिक्षक उपस्थित होते‌.

मुख्य संपादक : मनोज गाठले 

संपर्क : 9767883091

https://smitdigitalmedia.com/