मेसा येथे फरीद बाबा च्या भक्तांना भोजनदान व थंड पिण्याच्या पाण्याची सोय Providing food and cold drinking water to the devotees of Farid Baba at Mesa

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.25 जुलै) :- स्थानिक शेगाव येथून जवळच असलेल्या मेसा येथे हजरत फरीद बाबा यांचा दर्गा असून येथे दरवर्षी मोहरम सहावी च्या शुभ मुहूर्तावर येथे भव्य जत्रा भरत असून येथे जिल्ह्यातील अनेक गावातील सवारी येथे माथा टेकविण्या करिता येत असतात .

तसेच भाविक नागरिकांचे हे कुळ दैवत असल्याने या ठिकाणी तसेच जंगलात असलेले फरीद बाबांचा टेकडीवरील दर्गा येथे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात .

तर या भाविक भक्ताची गैरसोय न व्हावी या करिता गेल्या अनेक वर्षांपासून शेगाव येथील माठें कृषी केंद्र शेगाव चे संचालक मालक श्री विनोद माठे हे या भक्तासाठी मसाले भात भोजनदान देत असतात . यांना सहकार्य म्हणून गावातील नागरिक त्यांना हातभार लावत असून भाविक भक्तासाठी अनेक सोय सुविधांची उपलब्धता करीत असतात .

या वेळी देखील श्री विनोदभाऊ माठे , यांच्या सहकार्यातून येथील ग्राम पंचायत चे उपसरपंच श्री नीळकंठ वरभे यांच्या अथक प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला या करिता गावातील होमराज घुमे , संदीप काळे , मिथुन खाटीक, मुकेश खाटीक , महेश कातोरे .

देविदास पोहिणकर , राजू दडमल, विजय आंबटकर , सूरज वंजारी , सुमित वरभे, अनुप खाटीक , संतोष लोडे, अशोक जीवतोडे , अविनाश खिरटकर , सुभाष दडमल , विनोद दमाये , हनुमान जीवतोडे इत्यादी नी तसेच गावकऱ्यांनी लाख मोलाचे सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.