भद्रावतीत कारगील विजय दिवसाचे भव्य आयोजन Grand organization of Kargil Victory Day in Bhadravati

▫️जयहिंद फाउंडेशन, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट व पतंजली योग समितीचा संयुक्त उपक्रम(Jaihind Foundation, Sw. Srinivas Shinde Memorial is a joint initiative of Ravindra Shinde Charitable Trust and Patanjali Yoga Samiti)

✒️मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि 25 जुलै) :- स्थानिक श्री मंगल कार्यालयात दि. २६ जुलै २०२३ रोजी  सकाळी दहा वाजता जय हिंद फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चंद्रपूर, स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चारिटेबल ट्रस्ट चंद्रपूर आणि स्थानिक  पतंजली योग समिती  यांच्या संयुक्त विद्यमाने कारगील विजय दिवसाचे भव्य आयोजन करण्यात आलेले आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र शिंदे राहतील. पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन  करण्यात येईल. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे , भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे,

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे सहसचिव डॉ. विशाल शिंदे, यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, कर्मवीर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डी.डी. दोहतरे, वरिष्ठ माजी सैनिक रामचंद्र नवराते आणि  पांडुरंग हेमके उपस्थित राहतील.

     याप्रसंगी पतंजली योग समितीचे अनंता मते, शरद लांबे आणि सुनील वैद्य, जय हिंद फाउंडेशनचे सल्लागार कॅ. विलास देठे, चांदा . आयुध निर्माणीचे सेवानिवृत्त कर्मचारी पाठक, नवोदय स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष तथा नगरसेवक  प्रफुल चटकी ,बीआरएसपीचे अजय लिहितकर, जिवनविद्या प्रचारक पी .जे .टोंगे ,राष्ट्रीय धावपटू व कोच अजय तेलरांधे आणि एस. एस. चॅनलचे संदीप जीवने यांची प्रमुख उपस्थिती राहतील.

        या कार्यक्रमात शहरातील विद्यार्थी आणि पालक यांनी फार मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन ,जय हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष माजी सैनिक विजय तेलरांधे, जय हिंद फाउंडेशनच्या उपाध्यक्ष वीरपत्नी रजनी विनोद बावणे, जय हिंद फाउंडेशनचे सचिव माजी सैनिक संतोष आक्केवार,  जय हिंद फाउंडेशनचे कोषाध्यक्ष सिव्हील इंजिनियर प्रदीप गोविंदवार, कॅप्टन विलास देठे , माजी सैनिक प्रमोद गावंडे, माजी सैनिक सुरेश बोभाटे आणि स्व. श्रीनिवास  शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे  चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, समस्त माजी सैनिक वृन्द यांनी संयुक्तपणे केलेले आहे. 

विविध उपक्रमातून कारगील विजय दिवस साजरा करणार : – या कार्यक्रमात कारगील विजय दिवसाचे औचित्य साधून आजपर्यंत देशासाठी  तसेच कारगील युद्धांत शहीद झालेल्या संपूर्ण शुर विरांना सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. जेष्ठ माजी सैनिक तसेच कारगील युध्दात सहभागी झालेल्या आणि सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण़ योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल. प्रोजेक्टरच्या माध्यमातून उपस्थितांना कारगील युध्दा संबंधी माहिती देण्यात येईल.

कारगील युध्दात सहभागी झालेल्या माजी सैनिकांचे प्रत्यक्ष अनुभव ऐकता येईल. माजी सैनिकांसाठी कार्य करणाऱ्या जयहिंद फाऊंडेशन विषयी माहिती देण्यात येईल. सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या विविध समाज पयोगी  योजनांची माहिती देण्यात येईल. जिवनात व्यसनमुक्ती , योगा प्राणायम आणि योग नृत्य यांचे महत्व या विषयावर मार्गदर्शन केल्या जाईल. जिवन जगणे ही एक कला आहे , या विषयावर जिवन विद्येविषयी माहिती देण्यात येईल. वृक्षारोपन व वृक्षदान करण्यात येईल.