पिण्याच्या पाण्याची कॅन वितरण Distribution of drinking water cans

✒️ मनोज कसारे भद्रावती (Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.25 जुलै) :- विधानसभा प्रमुख वरोरा भद्रावती (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट)श्री रवींद्र शिंदे यांचे मार्गदर्शनात विधानसभा संघटक तथा उपसरपंच मंगेश उर्फ श्रीहरी भोयर आणि महिला संघटीका भद्रावती तालुका सौ आश्लेषा मंगेश उर्फ श्रीहरी भोयर यांचे नेतृत्वात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नंदोरी आणि अंगणवाडी क्रमांक 3 आणि 4 ला पिण्याच्या पाण्याची कॅन वितरण करण्यात आली.

सदर कार्यक्रमास डॉक्टर भूमिका येवले , एस बी बावणे रुपाली भडके ,मिरा आत्राम अंगणवाडी मदतनीस श्रीमती वेनुबई आत्राम सौ प्रियांका राहाटे उपस्थित होते.गावातील रुग्ण आले असता त्यांहा शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून हा उपक्रम हातामध्ये घेतला आहे .असे प्रतिपादन मंगेश उर्फ श्रीहरी भोयर यांनी केले.

कार्यक्रमास महेश निखाडे प्रसिध्दी प्रमुख भद्रावती तालुका,अखिल कुळसंगे,शुभम ठावरी,नितेश बुरांडे,स्वप्नील चामटकर,गणेश बल्की,चेतन डाहुले,हर्षल डाहूले,जगन भोयर,नैतिक जीवतोडे,गणेश ठेंगणे,तन्मय बलखंडे,मंगेश बल्की,महेंद्र येवले,सचिन येवले,नितेश बल्की,आकाश शेंडे,अजय शेंडे,अनुराग वाढई ,प्रथमेश ठावरी,रितेश पाचाभाई,अजय ठावरी उपस्थित होते..