घरकुल बांधकाम करण्यासाठी रेती नाही व कंत्राटदार कडे रेतीचा महापूर

🔸महसूल विभागांचे दुर्लक्ष विनोद उमरे यांचा आरोप

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.20 एप्रिल) :- महसूल विभागाच्या डोळ्यात रेती झोकत शासकीय काम करणाऱ्या कंत्राटरारानी रेती चे ढोगर साचवून प्रशासशला आव्हान दिले आहे.महसूल विभागाकडून रेती तस्करी करताना आढळल्यास ट्रक व ट्रॅक्टर कार्यवाही होत नाही.

रेती चोरी करुन हव्या त्या ठिकाणी रेती चे ढोगर केले तरी कोणतीही कार्यवाही केली जात असल्याने इरई नदीवरील पूलाचे बांधकाम करण्यासाठी रेती ची साठवण केली महसूल विभाग कसल्याही प्रकारचे रेती तस्करी करणाऱ्यावर कार्यवाही करताना दिसत नाही.याचाच फायदा उचलत चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील छोट्या -मोठ्या नदी नाल्यांची मोठी प्रमाणात रेती तस्करी केली जाते.

महसूल विभागांचे मोठे नुकसान केले आहे म्हणावसं काही हरकत नाही.लवकरात लवकर अवैध रेती तस्करी करणाऱ्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा व घरकुल लाभार्थ्यांना तात्काळ रेती उपलब्ध करुन देण्यात यावे अशी सुध्दा मागणी विनोद उमरे यांनी केली आहे.