अतिवृष्टी पावसामुळे भद्रावती,वरोरा तालुक्याची वाहतूक बंद Traffic in Bhadravati and warora talukas closed due to heavy rains

▫️विद्युत वाहिनीवर झाडे व वीज पडल्याने विद्युत पुरवठा ठप्प(Electricity supply stopped due to trees and lightning falling on power lines)

????अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे नुकसान(Massive crop damage due to heavy rains)

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि.27 जुलै) :- भद्रावती वरोरा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले असून अनेक मार्गाची वाहतूक ठप्प झालेली आहे…

बुधवार ला दुपारी आलेल्या पावसाने वरोरा भद्रावती तालुक्यातील अर्जुनी तुकुम, कोकेवाडा, वायगाव, चारगाव, आष्टा, किनारा,सोनेगाव, धानोली मुधोली, आदी गावाच्या फुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे या गावांचे संपर्क तुटलेला आहे

मात्र नागरिकांनी पुलावरील पाण्यामध्ये गाडी, सायकली धुवून मोठ्या प्रमाणात आनंद घेतल्या असून वरोरा तालुक्यातील मेसा जंगलामध्ये 33 के वी मुख्य वाहिनीवर झाड पडल्यामुळे तालुक्यातील गावांचा विद्युत खंडित झाली.

तसेच 11 के वी वाहिनीवर अनेक ठिकाणी विजेमुळे insulators फुटल्यामुळे विद्युत पुरवठा ठप्प झाला.अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतपिके पाण्याखाली येऊन शेत पिकांचे नुकसान झाले आहे.